1.
- गुरुजी,
- माझी लोकप्रियता कमी होतेय.
- कशी, राजन?
- लोक माझं ऐकत नाहीयेत.
- तू लोकांशी कसं बोलतोस?
- जसं तुमच्याशी बोलतो आहे.
- नाही, नाही,
- असं कोणी तुझं ऐकणार नाही.
- मग काय करू, गुरुजी?
- जोपर्यंत तू लोकांना घाबरवणार नाहीस,
- तोपर्यंत ते तुझं ऐकणार नाहीत.
2.
- लोकांना घाबरवायचं कसं, राजगुरू?
- माणसाला घाबरवणं हे जगातलं सर्वात सोपं काम आहे,
- राजन. कशानेही लोकांना घाबरवलं जाऊ शकतं.
- उदाहरणार्थ?
- उदाहरणार्थ,
- मेलेल्या उंदराने घाबरवा.
- भय ही खूप उत्तम भावना आहे, राजन.
- कशी?
- भयामुळेच लोकांमध्ये ऐक्य निर्माण होतं.
- आणि ते तुझ्याबरोबर येतात.
3.
- घाबरवण्याचा सर्वात उत्तम विषय कोणता, राजगुरू?
- याचं एकच तत्त्व आहे, राजन.
- कोणतं तत्त्व, राजगुरू?
- आधी हे जाणून घ्यायला हवं की कोणाला काय सर्वाधिक
- प्रिय आहे.
- त्याने काय होईल, गुरुजी?
- त्यानेच सर्व काही होईल, राजन. त्यानेच सर्व काही होईल.
4.
- तुला सर्वात प्रिय काय आहे, राजन?
- मला माझी सत्ता सर्वात प्रिय आहे.
- जर तुला सांगितलं की तुझी सत्ता जाणार आहे, तर?
- मी खूप घाबरेन.
- बस, हेच तत्त्व आहे.
- हे पक्कं लक्षात ठेव.
5.
- लोकांना सर्वात प्रिय काय असतं, राजन?
- धर्म.
- तुला लोकांना सांगावं लागेल की त्यांचा धर्म धोक्यात आहे.
- पण कोणाचा धर्म धोक्यात कसा असेल, राजगुरू?
- प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे. कुणीही कितीही धर्म-धर्म करू शकतो, त्याला कोण थांबवणार?
- हो, तू बरोबर बोलतोयस, कोणाचाही धर्म धोक्यात येऊ शकत नाही.
- मग लोकांना कसं...?
- भय निर्माण होत नाही,
- ते निर्माण केलं जातं, राजन.
- ही गोष्ट पक्की लक्षात ठेव.
6.
- भयाचे काय काय फायदे आहेत, राजगुरू?
- भयाचे असंख्य फायदे आहेत, राजन.
- काय?
- पहिला फायदा हा की लोक तुझं ऐकतात.
- आणि?
- दुसरा फायदा हा की लोक तुझ्याबरोबर एकत्र येतात.
- आणि?
- तिसरा फायदा हा की लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
- आणि?
- त्यानंतर लोक तुझ्याकडे सुरक्षिततेची मागणी करतात.
- सुरक्षिततेची मागणी?
- राजन, जनतेला संरक्षण देणं नेहमीच फायदेशीर असतं.
7.
- भयाचा आणखी एक मोठा पैलू आहे.
- तो काय बरं?
- राजन, भयासाठी शत्रू आवश्यक आहे.
- शत्रू?
- हो, राजन, शत्रू.
- त्याने काय होतं, राजगुरू?
- त्यानेच सर्व काही होतं, राजन.
- काय?
- शत्रू नसतील तर मित्र बनवणं खूप कठीण होईल.
8.
- शत्रू असण्याचे आणखी काय फायदे आहेत, राजगुरू?
- शत्रू असल्याने द्वेष आणि हिंसेची भावना निर्माण होते.
- द्वेष आणि हिंसेची भावना?
- खूप उत्तम, सर्वोच्च आहे द्वेष आणि हिंसेची भावना.
- कशी, राजगुरू?
- यामुळे सूड घेण्याची भावना निर्माण होते.
- सूड घेण्याची भावना?
- हो, सूड घेण्याची भावना.
9.
- सूड घेण्याच्या भावनेने काय फायदा होतो, राजगुरू?
- याच भावनेने सर्वात मोठा फायदा होतो.
- कसा?
- तो असा की सूडाच्या आगीत लोक अंध होतात.
- त्याचा काय फायदा?
- अंध लोकांकडून सत्तेला जितका फायदा मिळतो, तितका डोळस लोकांकडून मिळत नाही.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
भय का दर्शन
1.
- गुरु जी मेरी लोकप्रियता कम हो रही है।
- कैसे राजन?
- लोग मेरी बात नहीं सुनते।
- तुम लोगों से कैसे बात करते हो?
- जैसे आप से बात कर रहा हूं।
- नहीं नहीं इस तरह कोई तुम्हारी बात नहीं सुनेंगा।
- फिर क्या करूं गुरुजी?
- तुम्हारी बात लोग उस समय तक नहीं सुनाएंगे जब तक तुम उनको डराओगे नहीं।
2.
- लोगों को कैसे डराया जा सकता है राजगुरु?
- आदमी को डराना तो संसार का सबसे सरल काम है राजन। किसी भी चीज से लोगों को डराया जा सकता है।
- जैसे?
- जैसे मरे हुए चूहे से डर दो। डर तो बहुत ही उत्तम भाव है राजन।
- कैसे?
- डर से ही लोगों में एकता आती है।और वे तुम्हारे साथ आते हैं..
3.
- डराने का सबसे उत्तम विषय क्या है राजगुरु ?
- इसका एक ही सिद्धांत है राजन।
- क्या सिद्धांत है राजगुरु?
- पहले पता करना चाहिए किसको क्या सबसे प्रिय है।
- उस से क्या होगा गुरुजी?
- उसी से सब कुछ होगा राजन। उसी से सब कुछ होगा।
4.
- तुम को सबसे अधिक प्रिय क्या है राजन?
- मुझे सबसे अधिक प्रिय है मेरी सत्ता।
- अगर तुम्हें डरा दिया जाय कि तुम्हारी सत्ता चली जाएगी तो ?
- मैं बहुत डर जाऊंगा ।
- बस यही सिद्धांत है। इस को पकड़ लो।
5.
- लोगों को सबसे प्यारा क्या होता है राजन?
- धर्म ।
- तुम्हें लोगों से कहना पड़ेगा कि उनका धर्म खतरे में है।
- पर किसी का धर्म खतरे में कैसे हो सकता है राजगुरु? सबको अपने अपने धर्म पर चलने की आज़ादी है । जो जितना चाहे धर्म करें, कौन उसे रोक सकता है।
- हां तुम ठीक कहते हो किसी का धर्म खतरे में नहीं हो सकता।
-तब लोगों को कैसे .....?
- डर होता नहीं, डर पैदा किया जाता है राजन, यह बात गांठ में बांध लो.
6.
- डर के क्या क्या लाभ हैं राजगुरु?
- भय के अनगिनत लाभ हैं राजन ।
- क्या?
- पहला लाभ यह कि लोग तुम्हारी बात सुनते हैं।
- और ?
- और दूसरा लाभ यह है कि लोग तुम्हारे साथ संगठित होते हैं।
- और?
- तीसरा लाभ यह है कि लोगों में असुरक्षा की भावना पैदा होती है
- और
- उसके बाद लोग तुमसे सुरक्षा की मांग करते हैं।
- सुरक्षा की मांग?
- राजन जनता को सुरक्षा देना सदा लाभकारी होता है।
7.
- भय का एक और बहुत बड़ा पक्ष है।
- वह क्या है?
- राजन, भय के लिए शत्रु जरूरी है।
- शत्रु?
- हां रजन शत्रु।
- उससे क्या होता है राजगुरु?
- उसी से सब कुछ होता है राजन।
- क्या?
- शत्रु न हों तो मित्र बनाना बहुत मुश्किल हो जयेगा।
8.
- शत्रु होने से और क्या लाभ होते हैं राजगुरु?
- शत्रु होने से घृणा और हिंसा का भाव पैदा होता है।
- घृणा और हिंसा का भाव?
- बहुत उत्तम, सर्वोच्च है घृणा और हिंसा का भाव।
- कैसे राजगुरु?
- इससे बदला लेने की भावना पैदा होती है।
- बदले की भावना?
- हां बदला लेने की भावना।
9.
- बदला लेने की भावना से क्या लाभ होता है राजगुरु?
- सबसे बड़ा लाभ इसी भावना से होता है।
- कैसे?
- इस तरह कि बदले की आग में लोग अंधे हो जाते हैं.
- तो उस से क्या लाभ?
- अंधे लोगों से सत्ता को जितना लाभ पहुंचाता है उतना आंख वालों से नहीं पहुंचता.
©असगर वजाहत
Asghar Vajahat