माझ्या वडिलांची झीनत अमान

माझ्या वडिलांची झीनत अमान

माझ्या वडिलांची झीनत अमान

वडिल डायरी लिहायचे
कुणाची डायरी न वाचण्याचा
सल्ला पण द्यायचे
ते कुठे बाहेर गेल्यानंतर
टिनाच्या बाॅक्समध्ये लपलेल्या त्यांच्या डायर्‍या चाळल्यानंतर
एकोणीसशे ऐंशी ची कुठलीशी नोंदलेली तारीख
काही आवश्यक टिपणं
काही श्लोकांचे अर्थ
या सगळ्यांमधे
एक पिक्चर- पोस्टकार्ड 
गुलाबी बिकनीत-झीनत अमान
ज्याच्यामागे वडिलांनी लिहिलं होतं-
झीनत-म्हणजे-सौंदर्य
अमान-म्हणजे-असीम
असीम सौंदर्य!

या फोटोला पाहून 
तरणेबांड वडिल
ज्यांच्या दांडगाईचे किस्से 
फेमस आहेत गावात
शेतकरी वेष
धोतर-कुर्ता आणि
खांद्यावर उपरणंं
कुर्त्याला अत्तर चोपडून
रैले सायकल पळवत
थेटरात जात असत वडिल
मग स्वप्नांमधून बाहेर पडून
त्यांच्या डायरीच्या पानांवर
गुपचूप कब्जा होता
झीनत अमानचा
त्या काळातल्या सिनेमांतल्या
सर्वात बोल्ड अभिनेत्रीचा

इतिहास होऊन राहिलेले
त्या काळातले सिनेमे
जणू इतिहास बनली आहे
त्या काळातला-
झीनत अमान
इतिहास नाही होऊ शकले वडिल
ज्यांना कधी भेटली नाही
झीनत अमान

लोक विसरुन जातात
विसरले जातात जुने दिवस
पण विसरु शकत नाही कुणी
तारुण्यातले मनोरम दिवस
आणि जगातल्या
प्रत्येक पित्याची
तारुण्यातल्या कहाणीची खूण
आईच्या व्यतिरिक्त
अवश्य असते
कुणी ना कुणी
झीनत अमान!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मेरे पिता की ज़ीनत अमान 

डायरी लिखते थे पिता
किसी की डायरी नहीं पढ़ने की 
नसीहत भी देते
उनके कहीं जाने के बाद
टिन के बक्से में छिपी उनकी
डायरियाँ खँगालने के बाद
उन्नीस सौ अस्सी की कोई तारीख़ दर्ज
कई ज़रूरी नोट्स
कई श्लोकों की व्याख्या
इन सबके बीच
पिक्चर-पोस्टकार्ड एक
गुलाबी बिकनी में—ज़ीनत अमान
जिसके पीछे पिता ने लिखा था—
ज़ीनत—मतलब—सुंदरता
अमान—मतलब—असीम
असीम सुंदरता!

इस फ़ोटो को देखकर जवान और अक्खड़ पिता
जिनकी दबंगई के क़िस्से मशहूर हैं गाँव में
किसानी धज
धोती-कुर्ता पर
कंधे पर गमछा
कुर्ता पर गमकौवा लगाकर
रेले साइकिल दौड़ाकर
टॉकीज़ जाते रहे पिता
के सपनों से निकलकर
डायरी के पन्नों में
छुप-छुपकर क़ाबिज़ थी
ज़ीनत अमान
उस दौर की फ़िल्मों की
सबसे बोल्ड अभिनेत्री

इतिहास हो चुकीं
उस दौर की फ़िल्में
जैसे इतिहास हो चुकी 
उस दौर की—
ज़ीनत अमान
इतिहास न हो पाए पिता
जिनसे कभी नहीं मिली
ज़ीनत अमान

लोग भूल जाते हैं
भुला दिए जाते हैं पुराने दिन
पर भूल नहीं पाता कोई
जवानी के प्यारे से दिन
और दुनिया के
हर पिता की
जवानी की कहानी की निशानी
माँ के अतिरिक्त
ज़रूर होती है
कोई न कोई
ज़ीनत अमान! 
 
©अरुणाभ सौरभ
Arunabh Saurabh 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने