🚩
कुत्र्या-डुकरांचा
वाढला वावर
तोंडाचे गटार
बनलेले!
जातीजातींमध्ये
लावूनिया आग
सलोख्याची बाग
जाळताती!
मंदिरात सुरू
भटांची चंगळ
क्षीण होई बळ
शिक्षणाचे!
सुपारीबाजांचा
चालला हैदोस
वारकरी श्वास
कोंडलेला!
कथाखोर आणा
गायपट्ट्याहून
सोय होते छान
पोटार्थ्यांची!
देहू-आळंदीची
राखती ना वज
घालविती लाज
किर्तनाची!
अध्यात्मक्षेत्रात
लबाडांची सद्दी
मंबाजीची गादी
चालविती!
ज्ञानोबा-तुकोबा
आम्हां पंचप्राण
किमान हे भान
बाळगा रे!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav