नमिबियातील चित्त्यांनों,
तुम्हाला हे माझे खुले पत्र!
सर्वप्रथम,
सर्वांची हात जोडून
माफी! माफी! माफी!
मला ठाउक आहे,
हे पत्र थोडे उशिरा लिहितोय,
काय करू, वेळच मिळाला नाही.
फक्त एवढंच समजा की श्वास घ्यायलाही उसंत नव्हती.
आज थोडा वेळ मिळाला,
म्हणून लिहितोय.
हे एक बरं झालं की आमच्या नामकरणाचा
कोणताही विशेष समारंभ झाला नाही,
नाहीतर पत्र लिहायला आणखी एक-दोन महिने तरी विलंबच लागला असता!
तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगतो!
ऐकून तुम्ही आनंदाने नाचाल!
इथे आमचं इतकं स्वागत झालं की मी काय सांगू! मी तर इथल्या पंतप्रधान साहेबांचा खरा भक्त बनलो आहे. आणि त्याहूनही जास्त इथल्या लोकांचा, ज्यांनी असा पंतप्रधान निवडला. एका महान देशाचा अतिव्यस्त पंतप्रधान आपला वाढदिवस न साजरा करता आपल्या चित्यांचं स्वागत करतो.
दुसरा कुठला देश असता,
तर एखादा लहानमोठा अधिकारी येऊन आम्हाला घाईघाईत हलवलं गेलं असतं आणि कुणाला काही पत्ताही लागला नसता,फक्त एक-दोन तासांत काम संपलं असतं.
पण नाही, इथल्या लोकांची कर्मठता बघा, आमच्या येण्याची बातमी फक्त देशातच नाही, तर जगभर पसरली. जर एलियन्स असते, तर मी शंभर टक्के खात्रीने सांगतो, त्यांनाही आमच्या येण्याची बातमी मिळाली असती.
जय हो!
एक गोष्ट सांगू का तुम्हाला...
हसू नका!
सुरुवातीला तर मी पंतप्रधान साहेबांना वन्यजीव छायाचित्रकार समजून बसलो. आदरणीय पंतप्रधान साहेब स्वतः आमच्या सर्वांचे फोटो काढत होते आणि मीडियावाले आरती ओवाळत होते. पण जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पाहिली, तेव्हा मी थक्क झालो. ते तरुण दिसत होते,
आणि त्यांच्यासमोर आम्ही सत्तर वर्षांचे वाटत होतो!
मी कधीच विचार करू शकत नव्हतो की आमच्यासारख्या सामान्य प्राण्यांसाठी कुणी पंतप्रधान इतका वेळ देईल याचा. विशेषतः जेव्हा देश इतका मोठा आहे आणि लोकसंख्या १३० कोटींपेक्षा जास्त आहे!
आता तुम्ही सगळे कसे आहात?
सर्व काही कुशल आहे ना?
आमची काळजी घेऊ नका,
भावांनो. आम्ही सगळे खूप मजेत आहोत. इथे आमची धम्माल आहे. टीव्हीपासून वर्तमानपत्रांपर्यंत सगळीकडे आम्ही छापले गेलो आहोत. इथे येऊन किती दिवस झाले, तरीही आमची चर्चा सुरूच आहे. इतकी चर्चा तर संसदेत सामान्य माणसांची पण होत नाही! मला माहीत आहे, इथे काही लोक अशा गोष्टी बोलत होते.
आता मी त्यांना कसे समजावू,
की प्रत्येकाचे आपापले नशिब असते!
एक गोष्ट सांगू!
ऐ, तुम्ही जळू नका बरं का!
उर्दूत म्हणतात ना, फकत... तर आम्ही फक्त चित्ते राहिलो नाही, शुद्ध मराठीत म्हणतात ना, देवतुल्य... तर आम्ही देवतुल्य झालो. इथे पाहुण्याला देव मानतात. पण इथल्या ८० कोटी गरीब नागरिकांना काय मानतात, हे मला माहीत नाही. इथे कुणी सांगितलंही नाही. माहीत नसल्याने मला काही फरकही पडत नाही! पाहुण्याचा दर्जा मिळाल्याने मी खूप खूश आहे.....नमिबियाच्या जंगलाची शप्पथ!
खरं-खरं सांगा,
हे सगळं ऐकून तुम्हालाही इकडे येण्याची इच्छा होत असेल, नाही?
आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो.
आम्हाला इथे विमानाने आणलं. मस्त.
इथल्या पार्कमधल्या एका कर्मचाऱ्याला मी असं म्हणताना ऐकलं की आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं की या देशात हवाई चप्पल घालणारा माणूसही विमानाने जाईल.आम्ही तर हवाई चप्पलही घातली नव्हती, तरी आम्हा प्राण्यांना विमानात बसवलं गेलं. हे ऐकून पंतप्रधान साहेबांविषयीची मनात कृतज्ञता दाटली. मला समजलं की ते खूप दयाळू आहेत आणि त्यांचे प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. त्यांचे चाहते त्यांना खूप आदराने 'शेर' म्हणतात. मला खूप आवडलं.
यामुळे आम्हाला इथलं सगळं वातावरण जंगलासारखं वाटू लागलं. फक्त पार्कच नाही, तर हा संपूर्ण देश आमच्या घरासारखा वाटू लागला.
आय लव्ह दिस प्लेस व्हेरी मच!!!
तिथे काय चाललंय तुमचं?
इथे तर सगळं मजेत आहे. फक्त एकच अडचण आहे. इथे पार्कजवळ खूप आदिवासी दिसतात.ते भुकेलेले दिसतात.दुबळे दिसतात. त्यांना पाहून असं वाटतं की आमच्यासाठी जे अन्न ठेवलं आहे, ते त्यांना द्यावं. जवळ जाऊन त्यांचे चेहरे पाहिले की मन भरून येतं. दया येते. मनात येतं की चितळ सोडून यांना आपलं भक्ष्य बनवावं. आमच्यावर जेवढा खर्च केला गेला,तेवढ्यात तर यांचं पुनर्वसन झालं असतं! बघा ना,
मी कुठल्या फालतू गोष्टी बोलायला लागलो!
तुम्हाला माहीत आहे का?
हे ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल!
इथे आम्ही इतके व्हीआयपी आहोत की आम्हाला प्रायव्हसी मिळत नाही. देवतुल्य पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळे आमच्याकडे लक्ष देतात.
कदाचित याच कारणाने काही लोक आमच्यावर जळतातही. कालच कोणाला तरी बोलताना ऐकलं की काळ्या पैशाऐवजी आम्हाला आणलं गेलं आहे.पळून गेलेल्यांऐवजी वेगाने धावणाऱ्यांना आणलं गेलं आहे. काहीजण म्हणत होते की
आजकाल रुपया खूप कमजोर झाला आहे. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंटची गरज आहे. जे काही असो, आम्ही काय करू शकतो! आम्ही तर अजून विदेशी आहोत, जे काही करायचं असेल ते इथल्या नागरिकांना करावं लागेल! रुपया कमजोर होत असला, तरी आम्ही मात्र इथे दिवसेंदिवस मजबूत होत आहोत. आमच्यासाठी पार्कात सोडलेल्या चितळांचा आम्ही मनसोक्त आनंद घेत आहोत. इथे येऊन किती दिवस झाले, पण आमचं वजन झपाट्याने वाढत आहे. (भाव तर पहिल्याच दिवशी वाढले होते.) असं वाटतंय की लवकरच आम्ही जास्त वजनाचे होऊ!
तिथलं हवामान कसं आहे?
लोक कसे आहेत?
इथले लोक तर खूप भोळेभाबडे आहेत. जे सांगशील, ते मानतात. जे दाखवशील, ते पाहतात. जे बोलशील, ते ऐकतात. उभे राहून आम्हाला स्टँडिंग ओव्हेशन देतात. निराश होऊन नाही, तर उत्साहाने टाळ्या वाजवतात. आपले कामधंदे सोडून आम्हाला पाहण्याचा त्यांनी आपला रोजगार बनवला आहे. त्यांचा उत्साह पाहून वाटतं की त्यांच्या आयुष्यात फक्त आमचीच कमतरता होती. बस!
अरे! एक गोष्ट सांगायची राहिलीच!
इथे आम्हां आठ चित्यांना नवी नावं दिली गेलीयत. (इथल्या चौकीदारांनी) माझं नाव अमृत, गोलूचं नाव उत्सव, छोटूचं नाव गौरव, मुनियाचं नाव प्रगती, बच्चीचं नाव अच्छी, झुलनीचं नाव गरीमा, कनियाचं नाव संस्कृती आणि मुन्नीचं नाव उन्नती झालं आहे.
इथे सगळं चांगलं आहे. माझं ऐका, तुम्ही सगळे इथे या! चांगलं होईल! इथले पंतप्रधान साहेब खूप चांगले आहेत. त्यांच्या कृपेने आम्ही सगळे उत्तम आहोत. बाकी सगळं मस्त आहे. तुम्ही सगळे स्वतःची काळजी चांगली घ्या. आमची काळजी घ्यायला इथली संपूर्ण मीडिया आहे.
ठिक, आता लिहिणं थांबवतो.
ता.क.- एक गोष्ट राहिलीच!
माहीत आहे? आज सकाळच्या नाश्त्याचं काय सांगू! लुसलुशीत चितळ खाल्लं,ज्याचं नाव विकास होतं!
बाय!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी
चीते का नामीबिया के चीतों को खुला पत्र!
सबसे पहले सभी जन से हाथ जोड़कर माफी! माफी! माफी!
जानता हूं,पत्र देर से लिख रहा हूं। क्या करूं, टाइम ही नहीं मिला। बस यह समझ लो कि सांस लेने की फुरसत ही नहीं थी। आज कुछ टाइम मिला तो लिख रहा हूं। वो तो अच्छा हुआ कि हमारे नामकरण संस्कार का कोई अलग से समारोह नहीं हुआ,नहीं तो पत्र लिखने की फुरसत महीने दो महीने बाद मिलती!
तुम सबको एक बात बताता हूं! जानोगे तो खुशी से झूम उठोगे!
यहां हमारी इतनी आवभगत हुई कि मैं क्या कहूं! मैं तो यहां के पीएम सर का समझो कट्टर भक्त हो गया हूं। और उससे ज्यादा यहां के लोगों का,जिन्होंने ऐसा पीएम अपने लिए चुना। एक महान देश का अतिव्यस्त पीएम अपना बर्थडे न मनाकर हम चीतों की अगवानी कर रहा है। और कोई देश होता तो कोई टुच्चा-सा अधिकारी आनन-फानन में शिफ्ट करा देता और किसी को पता भी नहीं चलता। घंटे-दो घंटे में काम फिनिश। लेकिन नहीं यहां के लोगों की कर्मठता देखिए कि हमारे आने की खबर पूरे देश में ही नहीं विश्व में फैल गई। अगर एलियंस होते होंगे तो मैं हंड्रेड टेन पर्सेंट स्योर हूं कि उन्हें भी हमारे आने की खबर मिल गई होगी। जय हो!
एक बात बताऊं तुम लोगों को... हंसना नहीं!
शुरू-शुरू में तो पीएम सर को मैं वाइल्ड लाइफ फोटोग्राफर समझा। आदरणीय पीएम सर हम सब जन की खुद फोटो उतार रहे थे और मीडिया आरती। लेकिन जब चहेरे की चमक देखी तो मैं देखता रह गया। वे चिर युवा जैसे दिख रहे थे और उनके सामने हम सत्तर साल के लग रहे थे! मैं सोच भी नहीं सकता था कि हमारे जैसे तुच्छ प्राणी के लिए कोई पीएम इतना समय देगा। और खासतौर से तब जब देश इतना बड़ा हो और जहां की जनसंख्या एक सौ तीस करोड़ से ज्यादा हो!
अभी तुम लोग सब कैसा है! सब मस्त न!
हमारी टेंशन बिलकुल भी मत लेना भाई लोग। हम सब बहुत मजे में हैं। जलवे है हमारे। टीवी से लेकर न्यूज पेपर तक हम छाए हुए हैं। यहां आए हुए हमें कितने दिन हो गए, फिर भी हमारी चर्चा हो रही। इतनी चर्चा तो संसद भवन में आम आदमी की नहीं होती! मेरे को मालूम है। इधर कुछ लोग ऐसी बातें कर रहे थे। उन्हें अब मैं क्या समझाता कि अपनी-अपनी किस्मत है।
एक बात बताऊं! ए तुम लोग जलना नहीं! हैं!
वो उर्दू में बोलते हैं न, फकत.. तो हम फकत चीता नहीं रहे, वो शुद्ध हिंदी में बोलते हैं न,देव तुल्य... तो हम देव तुल्य हो गए। यहां अतिथि को देवता मानते हैं। पर यहां के अस्सी करोड़ गरीब नागरिकों को क्या मानते हैं,अपने को नहीं पता। कोई बताया भी नहीं इधर। पता न होने से अपने को कोई हर्जा भी नहीं! अतिथि का दर्जा पाकर अपन बहुत खुश हैं। नामीबिया के जंगलों की कसम!
सच-सच कहना तुम सब! यह सब जानकर अब तुम लोगों का मन कर रहा होगा यहां आने का! क्यों है न!
अभी तुम सबको एक और बात बताता हूं। हमें यहां हवाई जहाज से लाया गया। मस्त। यहां पार्क के एक कर्मचारी को मैं यह कहते हुए सुना कि आदरणीय पीएम साहब ने कहा था कि इस देश का हवाई चप्पल पहनने वाला भी हवाई जहाज से चले। अपन तो हवाई चप्पल भी नहीं पहना था,फिर भी हम जानवरों को हवाई जहाज में बैठा दिया। यह सुनकर पीएम जी के लिए इधर दिल में आभार। मैं समझ गया कि वे बहुत दयालु हैं और उनको जानवरों से विशेष प्रेम है। उनके फैंस उन्हें बहुत सम्मान से शेर बुलाते हैं। मुझे खूब भाया। इससे यह फायदा हुआ कि हमें यहां का पूरा माहौल ही जंगलनुमा लगने लगा। पार्क ही नहीं हमें पूरा देश ही अपने घर जैसा फील होने लगा। आई लव दिस प्लेस वैरी मच!!!
उधर क्या चल रहा है तुम लोगों का!
इधर तो सब मजे में हैं। बस एक बात की दिक्कत है। यहां पार्क के पास हमें बहुत आदिवासी दिखते हैं। वे भूखे लगते हैं। कमजोर दिखते हैं। उनको देखकर लगता है कि हमारे लिए जो भोजन का प्रबंध किया गया है,वो उनको दे दूं। पास जाकर जब उनके चेहरे को देखता हूं तो जी भर आता है। दया आ जाती है। मन करता है कि चीतल को छोड़ इनको ही अपना भोजन बना लूं। जितना पैसा हमारे ऊपर खर्च किया गया है,उतने में इनका पुनर्वास हो जाता! देखो न कहां की फालतू बात लेकर मैं बैठ गया!
जानते हो तुम सब! सुनकर तुम्हारी छाती चौड़ी हो जायेगी!
यहां हम इतने वीआईपी हैं कि प्राइवेसी नहीं मिलती। देवता तुल्य पीएम से लेकर पब्लिक तक सब हम में खूब इंटरेस्ट ले रहे। शायद इसी वजह से कुछ लोग हम से जलने भी लगे हैं। कल ही किसी को कहते हुए यह सुना कि काले धन की जगह हमें लाया गया है। भगोड़ों को न लाकर तेज दौड़ने वालो को लाया गया है। कुछ कह रहे थे कि आजकल रुपया बहुत कमजोर हो गया है। उसको वीआईपी ट्रीटमेंट की जरूरत है। जो भी हो हम क्या कर सकते हैं! हम तो अभी परदेशी हैं, जो भी करना होगा यहां के नागरिकों को करना होगा! रुपया चाहे कमजोर होता हो, मगर हम यहां दिनोंदिन मजबूत हो रहे हैं। हमारे लिए पार्क में छोड़े गए चीतलों का हम भरपूर मजा ले रहे हैं। अभी हमें आए हुए कितने दिन ही हुए, मगर हमारा वजन तेजी से बढ़ रहा है। (भाव तो पहले ही दिन से बढ़ गए थे।) लगता है कि जल्द ही ओवर वेट हो जायेगे!
वहां का मौसम कैसा है! लोग कैसे हैं!
यहां के लोग तो बहुत मासूम है। जो कह दो,उसे मान जाते हैं। जो दिखा दो, उसे देख लेते हैं। जो बोल तो, उसे सुन लेते हैं। खड़े होकर हमें स्टैंडिंग ओवेशन दिए। मायूस हो कर नहीं जोश में ताली बजाए। अपना काम धंधा छोड़ हमे देखने का अपना रोजगार बना लिया। इनके उत्साह को देखकर मुझे लगा कि इनके जीवन में बस हमारी ही कमी थी। बस!
अरे! एक बात तो बताना भूल ही गया!
यहां हम आठ चीतों को नए नाम दिए गए। (यहां के चौकीदारों द्वारा) मेरा नाम अमृत, गोलू का नाम उत्सव, छोटू का नाम गौरव। मुनिया का नाम प्रगति। बच्ची का नाम अच्छी। झुलनी का नाम गरिमा। कनिया का नाम संस्कृति और मुन्नी का नाम उन्नति हो गया है।
यहां सब अच्छा ही अच्छा है।मेरी मानो तो तुम सब भी यहां आ जाओ! अच्छा रहेगा! यहां के पीएम सर बहुत अच्छे हैं। उनकी कृपा से हम सब अच्छे हैं। बाकी सब अच्छा है। तुम सब अपना खयाल अच्छे से रखना। हमारा खयाल रखने के लिए यहां की पूरी मीडिया है।
अच्छा,अब लिखना बंद करता हूं।
लो ये बात तो रही जा रही थी! पता है!आज सुबह के नाश्ते का तो क्या ही कहना! नर्म चीतल को खाया है जिसका नाम बिकास था।
बाय!
©अनूप मणि त्रिपाठी
Anoop Mani Tripathi