🚩
सरंजामी जीभ सोडलेली सैल
पंताच्या दावणीला सत्तांध बैल
जातदांडग्यांचे हे स्त्रीद्वेष्टे बोल
निषेधार्हच!
भाजप-संघाची निरंकुश सत्ता
आंड ठेचायचा घेतलेला मक्ता
भ्रष्ट वळूंसाठी हा एकमेव रस्ता
बचावलेला!
भटी सापळ्यात अडकले मरहट्टे
थोरले असून व्हावे लागले धाकटे
आरक्षणश्रेयाचे हे फडणविसी रट्टे
सोसवेनात!
साडेतीन टक्क्यांची नेहमीच सरशी
लढाऊ जातीला बिन दोराने फाशी
मनुनीतीने ठासली जिरवली खाशी
पद्धतशीर!
रयतकल्याणाचा तो उज्ज्वल वारसा
विसरले म्हणून राज्य जाहले खालसा
धोतरं धुण्याचीही आठवेल अवदसा
लवकरच!
गोरगरीब गरजवंत जनतेचा कळवळा
जिजाऊ-शिवराय-शाहूराजांनी केला
वैर्यांमुळे गावगाडा उद्धवस्त व्हायला
लागला आता!
गढीमधली मढी गुदमरायला लागली
भविष्यासाठी आदळआपट चालली
वर्णवर्चस्ववाद्यांना गा भेटली चांगली
सुवर्णसंधी!
सनातनी-सरंजामी लै वंगाळ युती
बहूजनांच्या ताटात कालवली माती
कष्टकरी शेतकरी शिव्याशाप देती
रात्रंदिवस!
फुकट धान्याचे सरकारी उपकार
लाडक्या बहिणींना पैशाचा आहेर
धनदांडग्यांना अवघे जंगल-डोंगर
आंदण देती!
फिरवली किल्ली दिली दिली ढील
सकळ सत्ताकेंद्रे एका हाती राहतील
ग्रामसेवका येई प्रधानसेवकाचा फिल
अधूनमधून
''फोडा नि झोडा'ची कुनीती अवलंबती
अठरापगड जातींची उतरंड सांभाळती
कपटकारस्थान्यांची क्रूर खुनशी नीती
समजून घ्यावी!
🚩
©भरत यादव
Bharat Yadav