लेखन आणि धमकी

लेखन आणि धमकी

लेखन आणि धमकी

एक दिवस धमकी मिळाली
नरडीचा घोट घेऊ तुझ्या
खूप लिहितोस रे आमच्याविरुद्ध

मी विचारलं मग काय भिऊ?

आणखी काय म्हणतोय मग आम्ही!

तिसर्‍यादिवशी पुन्हा फोन आला
मारुन टाकू आम्ही तुला

आता काय झालं?

तुझ्या शब्दांपेक्षा जास्त
तुझे मौन भयंकर आहे
लिही,साल्या, लिही...

आठव्या दिवशी पुन्हा फोन आला
गळा चिरुन टाकू तुझा

आता काय झालं?
लिहायला तर लागलोय..

मादर,याला तू लिहिणं म्हणतोस
विष ओकतोयस, तू विष

मग काय घाबरुन जाऊ?

लिही डुकरा पण भीत-भीत लिही

परत तेराव्यादिवशी फोन आला
अरे घूबडाच्या वाणाच्या
इतका पण नको भिऊस की तू 
सगळ्यांना भ्यालेला दिसशील
असं लिही की वाटावं की
आम्ही नसतो तर तुझा बापसुद्धा लिहू शकला नसता!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

एक दिन धमकी मिली
हलाक कर देंगे तुझे
बहुत लिखता है हमारे खिलाफ 

मैंने पूछा तो क्या डर जाऊं?

और क्या कह रहे हैं हम!

तीसरे दिन फिर फोन आया
मार डालेंगे हम तुझे

अब क्या हुआ?

तेरे शब्दों से ज्यादा 
तेरी चुप्पी खतरनाक है
लिख, साले, लिख

आठवें दिन फिर फोन आया 
गला रेत देंगे तेरा

अब क्या हुआ 
लिख तो रहा हूं 

मादर, इसे तू लिखना कहते हैं 
ज़हर उगल रहा है, तू ज़हर 

तो फिर क्या डर जाऊं?

लिख सूअर मगर डर- डर के लिख

फिर तेरहवें दिन फोन आया
अबे उल्लू के पट्ठे
इतना भी मत डर कि तू सबको 
डरा हुआ नजर आए
ऐसा लिख कि लगे कि
हम न होते तो तेरा बाप भी लिख नहीं पाता !

©विष्णु नागर
Vishnu Nagar 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने