जे विरुद्ध आहेत
देशद्रोही आहेत
जे सोबत आहेत
देशभक्त आहेत
जे गप्प आहेत
देशप्रेमी आहेत
जे आवाज उठवताहेत
सत्ताविरोधी आहेत
ज्या विद्यार्थ्यांवर
काठ्या बरसवल्या जाताहेत,
बंडखोर आहेत
जे बरसत्या काठ्या पाहून गल्ली बदलताहेत,
सभ्य-शालीन आहेत
जो जमीन,जंगल,झाडांविषयी बोलतोय,
अर्बन नक्सली आहे
जे शेतकर्यांचा हक्क मागताहेत
गद्दार आहेत
ज्यांची कागदपत्रं परिपूर्ण नाहीत,
ते अवैध आहेत
ज्यांचा विवेक गहाण पडलाय,
ते वैध आहेत
कालपर्यंत जे पुरस्कृत होते
आज तुरुंगात आहेत
जे तुरुंगात होते
आज त्यांचा जयजयकार आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जो ख़िलाफ़ है
देशद्रोही हैं
जो साथ है
देशभक्त हैं
जो चुप है
देशप्रमी हैं
जो आवाज़ उठा रहे हैं
सत्ता विरोधी हैं
जिन छात्रों पर लाठियां भांजी जा रही हैं
बागी हैं
जो टूटी लाठियों देखकर गली बदलता हैं
सभ्य-शालीन है
जो जमीन, जंगल, पेड़ की बात करता है
अर्बन नक्सल हैं
जो किसानी का हक़ मांग रहे
गद्दार हैं
जिनके काग़ज़ात पूरे नहीं
अवैध है
जिनके जमीर गिरवी है
वैध हैं
कल तक जो पुरस्कृत थे
आज जेलों में हैं
जो जेलों में थे
आज उनके जयकारे हैं
©निलोत्पल 'उज्जैन'
Neelotpal Ujjain