देव जेव्हा एकमेकांना मिठी मारतात
सरईचं फूल हसू लागतं
मोर टाळ्या वाजवत नाचू लागतो
जंगल गाऊ लागतं पूर्वजांचं गाणं
गाणं,
ज्याच्या ध्वनीत आमच्या असण्याचा आदिम सुगंध आहे
आमच्या सुगंधाने पृथ्वीच्या देहावर एक फूल उमलतं
फूल जे कधीच शिळे होत नाही
ज्याच्या सुगंधाने देव जागा होतो
आणि त्याचा देह थिरकू लागतो
देवाला असं नाचताना पाहून
असं वाटतं की
जणू या प्राचीन धरित्रीने
आत्ता आत्ताच घेतला आहे श्वास
जणू आत्ताच हवेत उडालाय
एखादा लाल रुमाल
जणू आत्ताच कुणी माडिया आलाय
चरणी, नवसाचे सुख बांधून
जणू आत्ताच कुणी पूर्वज आला आहे
तुरहीच्या धुनीमध्ये मनातली गोष्ट सांगायला
एकाच आसनावर बसून बसून
देवाची मान आखडू नये
म्हणून देवाने नाचत राहिलं पाहिजे
देवाने वारंवार गळाभेटी करीत राहावं
जेणेकरून मानेसोबत
देवाचा देहदेखील हलता-डुलता राहील
देवाचा हलता-डुलता देह
ही आकांक्षा आहे
सरईच्या झाडांसाठी
आकांक्षा आहे पूर्वजांच्या उरल्यासुरल्या श्रद्धेसाठी
आशा आहे पूर्वजमातेच्या
रिकाम्या दुरडी-टोपलीसाठी
आकांक्षा आहे
त्या एका शिल्लक किंकाळीची
ज्यात मनुष्य देवासारखा
आणि देव मनुष्यासारखा किंकाळी फोडून म्हणतो आहे
जंगलातून आम्ही बाहेर पडलो
पण जंगल आमच्या आतून
कधीच बाहेर पडणार नाही
कधीच नाही म्हणजे कधीच नाही.
---------
शब्दार्थः
देव-लोकदेव
सरई-सालवृक्ष
तुरही-एक आदिवासी वाद्य
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कभी नहीं मतलब कभी नहीं
देव जब आपस में गले मिलते हैं
सरई का फूल हँसने लगता है
मोर ताली बजाते हुए नाचने लगता है
जंगल गाने लगता है पुरखों का गीत
गीत, जिसकी धुन में हमारे होने की आदिम गंध है
हमारी गंध से पृथ्वी की देह पर खिलता है एक फूल
फूल जो कभी बासी नहीं होता
जिसकी महक से जाग उठता है देव
और झूमने लगती है उसकी देह
देव को इस तरह थिरकते हुए देखकर
ऐसा लगता है जैसे इस आदिम धरती ने
अभी-अभी ली हो साँस
कि अभी-अभी हवा में उड़ा हो कोई लाल रुमाल
कि अभी-अभी कोई माड़िया आया हो पैरों में
मन्नत का सुख बाँधकर
कि अभी-अभी कोई पुरखा आया हो
तुरही की धुन में मन की बात कहने
एक ही आसन पर बैठे-बैठे अकड़ न जाए देव की गर्दन
इसलिए देव को नाचते रहना चाहिए
देव को मिलते रहना चाहिए गले बार-बार
ताकि गर्दन के साथ-साथ
हिलती-डुलती रहे देव की देह
देव की हिलती-डुलती देह उम्मीद है
सरई के पेड़ों के लिए
उम्मीद है पुरखों की बची-खुची आस्था के लिए
उम्मीद है पुरखिन की खाली टोकरी के लिए
उम्मीद है उस एक बची हुई चीख की
जिसमें मनुष्य देव की तरह
और देव मनुष्य की तरह चीखकर कह रहा है
जंगल से निकले हैं हम
पर जंगल हमारे भीतर से
कभी नहीं निकलेगा
कभी नहीं मतलब कभी नहीं।
©Poonam Wasam
पूनम वासम