मूत

मूत

मूत

इतिहासातून निघून येते एक मुताची धार
वर्तमानाच्या चेहर्‍यावर तेजाबाप्रमाणे कोसळते

मुताच्या तलवारीनेदेखील 
कापली जाऊ शकते माणसाची मान

मुताचा चाकू घुसतोय 
एका समूहाच्या आतड्यांमध्ये
आणि समूह, 
ठसठसणार्‍या जखमांना दोन्ही हातांनी दाबून 
छोट्या अन्ननलिकेच्या चिंतेने भयभीत
रक्ताची लघवी करुन बसून जातोय

मनुष्य असण्याच्या सन्मानाचा 
विध्वंस करण्याच्या सर्वात उंच
कल्पनेत जाऊन त्यांनी आम्हांला,
आमच्या खेटरात भरुन मूत पाजलेय
संस्कृतीच्या आरशात आम्हांला 
तेव्हाही लुकलुकताना पाहून
घृणेच्या तेजाबी धारेने
आमच्या चेहर्‍यावर मुतलेत
अशा तर्‍हेने आम्हाला नष्ट केले गेले
त्यांच्या मुताने झाले शुद्धीकरण
आमचा मूत आम्हांलाच चाटवण्यात आला

मुताच्या माराने मरण पावलेल्या
लोकांची प्रेतं पाहून
पिढीजात आक्रोशात अजूनही माझे शरीर थरथरत असते
हे तेच आहे जे माझ्या भाषेचे व्याकरण बिघडवते
जे माझ्या आवाजात कंपन निर्माण करते

डाॅक्टर विहाग वैभव! तुम्ही सांगू शकाल काय?
एकविसाव्या शतकातील तिसर्‍या दशकात, 
कुणाचा मूत आहे हा, 
जो माझ्या डोळ्यांतून वाहतो आहे?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मूत 

इतिहास से निकलकर आती है एक मूत की धार 
वर्तमान के चेहरे पर तेजाब की तरह गिरती है 

मूत के तलवार से भी काटी जा सकती है 
एक इंसान की गर्दन 

मूत का चाकू घुसता है एक समूह की अंतड़ियों में 
और समूह, रिसते घाव को दोनों हाथों से दबाए 
छोटे आहारनाल की चिंता में भयभीत 
खून का पेशाब करके बैठ जाता है 

मनुष्य होने के मान को ध्वंस करने की 
सबसे ऊँची कल्पना में जाकर उन्होंने 
हमें, हमारी जूतियों में मूत भरकर पिलाया 
सभ्यता के आईने में हमें तब भी झिलमिलाता देख 
घृणा के तेजाबी धार से 
हमारे चेहरों पर मूत दिया 
इस तरह से हमें मिटाया गया 
उनकी मूतों से हुआ शुद्धिकरण 
हमारी मूतों को हमें चटाया गया 

मूत की मार से मर गए मेरे लोगों के शव देख 
पुश्तैनी आक्रोश में अब भी मेरा बदन थरथराता है 
यह वही है जो मेरी भाषा का व्याकरण बिगाड़ता है 
जो मेरी आवाज में कंपकंपाता है - 

डॉक्टर विहाग वैभव !
क्या तुम बता सकते हो ? 
एक्कीसवीं सदी के तीसरे दशक में
यह किसका मूत है 
जो मेरी आँखों से बह रहा है? 

©विहाग वैभव
Vihag Vaibhav 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने