'माझ्यावर बलात्कार झालाय.'
जेव्हा जुन्या प्रेतानं हे सांगितलं तेव्हा
नवं प्रेत म्हणालं,
'माझ्यावर तर सामुहिक झालाय.'
'अरे रे! तु पण!'
'होय,मी सुद्धा'
किती काय काय सहन केलं असेल तू!'
जुन्या प्रेतानं सहानुभूती दाखवली.
'ते दयाळू निघाले.
नंतर त्यांनी मला मारुन टाकलं'
नव्या प्रेतानं आपल्यावरचा प्रसंग सांगितला.
शवागारात क्षणभर स्मशानशांतता पसरली.
'तू आत्महत्या केलीस की
माझ्याप्रमाणे तुलाही मारुन टाकलेय!'
नव्या प्रेतानं आपलं मौन तोडलं.
'या बाबतीत मी लकी ठरले!'
जुनं प्रेत म्हणालं.
'लकी???'
'हां,
माझ्यावर मेल्यानंतर बलात्कार केला गेलाय.'
'कधी?कुठं?'
नव्या प्रेतानं अवाक होऊन विचारलं.
'थोड्या वेळापूर्वी...इथे...'
जुनं प्रेत बोललं.
नव्या प्रेताला समजेना की
स्वतःला अभागी म्हणावं की
त्या प्रेताला लकी!
अचानक त्याला जाणवायला लागलं की
ते वेगाने हलते आहे.
नवे प्रेत किंचाळू पाहात होतं,
पण आवाजच बाहेर निघाला नाही.
जुन्या प्रेतानं पाहिलं की
शवागार पसरत चाललंय आणि
पसरता पसरता त्याचा इतका विस्तार झाला आहे
की
त्यात सहजपणे एक देश सामावून जाऊ शकेल.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
लकी
' मेरा रेप हुआ है।'
जब पुरानी लाश ने यह बताया तो नई लाश बोली,' मेरा तो सामूहिक हुआ है!'
' ओह! तुम भी! '
' हां मैं भी! '
' कितना कुछ सहा होगा तुमने!' पुरानी लाश ने सहानुभूति जताई।
' वे दयालु निकले। बाद में उन्होंने मुझे मार दिया! नई लाश ने आपबीती बताई।
मोर्चरी में थोड़ी देर के लिए सन्नाटा छा गया।
'तुमने आत्महत्या की है या मेरी तरह तुमको भी मार दिया गया!' नई लाश ने चुप्पी तोड़ी।
' इस मामले में मैं लकी निकली!' पुरानी लाश बोली।
' लकी!!!'
' हां, मेरे मरने के बाद मेरा रेप किया गया।'
' कब! किधर!'नई लाश ने चौंकते हुए पूछा।
' थोड़ी देर पहले... इधर....' पुरानी लाश ने बताया।
नई लाश समझ नहीं पा रही थी कि खुद को अभागी कहे या उसे लकी! सहसा उसने महसूस किया कि वह तेजी से हिल रही है । नई लाश ने चीखना चाहा, मगर उसकी आवाज नहीं निकली।
पुरानी लाश ने देखा कि मोर्चरी फैलती जा रही है। फैलती जा रही है और फैलते- फैलते उसका इतना विस्तार हो चुका है कि उसमें आसानी से एक देश समा जाए!
©अनूप मणि त्रिपाठी
Anoop Mani Tripathi