मनुस्मृतीखोरांनी ओलांडली हद्द
संविधानxसनातन हातघाईला युद्ध
सडक्या मेंदूतल्या किड्यांची औलाद
झाली मस्तवाल!
धर्मखोर केंद्रसत्तेचा लाभतो आधार
शपथ घेतली ज्याची त्यालाच नकार
संविधानद्रोही झाले सनातनी लाचार
उघड उघड!
सनातन शब्द मूळ श्रमणपरंपरेतला
निर्लज्जपणे वैदिकांनी अगा ढापलेला
अर्थच सनातनचा पार बदलून टाकला
सांप्रतकाळात!
शतकानुशतके हे असेच बा घडलेले
बहूजनांचे जे अस्सल ते ते लाटलेले
स्व-परंपरेतले म्हणून त्यास बिंबवले
जनमनावर!
ज्ञातिनिष्ठ अहंगंडाचा माजला पसारा
मनातला माणुसकीचा आटलेला झरा
वर्णवादी-जातीयवादी मनुचा पिसारा
मिरविती व्यर्थ!
इतकी मस्ती-इतका माज येतो बा कुठून
निलाजर्या परंपरांचा निर्लज्ज अभिमान
दुटप्पीच जगणे ज्यांचे अन् दुटप्पी जीवन
सदा सर्वकाळ!
जातश्रेष्ठत्वाच्या गंडाने ठार पछाडले मूढ
देव-धर्म-संस्कृतीचे ज्यांनी मांडले थोतांड
संघप्रणित सत्तेतून कैक ऐसे निपजले षंढ
नाही मोजदाद!
अप्पलपोट्या वृत्तीला देवाधर्माचा आधार
चटक लागली शोषणाची थोतांड वाटे थोर
जित्या माणसाची विटंबना,सजला बाजार
इथे दगडांचा!
मस्तवाल तिवारीला रेशीमबागेचे अभय
नथ्थ्याच्या पिलावळीची नको आता गय
मडके-खराटा पुन्हा बांधू पाहताय काय?
गळ्यात आमच्या?
लोकशाही भारतावरचा हा हल्ला भयंकर
माजोरड्या कुप्रवृत्तीला द्यावे ठाम उत्तर
न्यायासनाच्या अवमानाचा त्रिवार धिक्कार
करीतच राहू!
-भरत यादव
Bharat Yadav