सनातनच्या नावाखाली....

सनातनच्या नावाखाली....

सनातनच्या नावाखाली...

ते गौरी लंकेशला
दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारतात,
महिषासुराला नायक मानले म्हणून
मोदी-शहा यांना खोटं ठरवलं म्हणून
कलबुर्गीचा जीव घेतात,
बसवण्णांच्या वचनांना
प्रकाशित केलं म्हणून.
बसवण्णांनी आव्हान दिलं होतं,
ब्राह्मण-पुरुषी श्रेष्ठतेला.
ते गोविंद पानसरे यांना
संपवून टाकतात,
चितपावन पेशव्यांच्या
क्रौर्याला उघड केलं म्हणून.
शिवरायांना ब्राह्मण-गाई यांचे
प्रतिपालक नव्हे,
ब्राह्मण्यवादाला आव्हान देणारा
कुळवाडीभूषण सांगितलं म्हणून
त्यांनी दाभोलकरांना मृत्यूच्या
दाढेत ढकललं,
सनातनी अंधश्रद्धा-थोतांडांचा
पर्दाफाश केला म्हणून.
ते आपल्या बिळांमधून बाहेर पडलेत,
नव्या पेशवाई राज्यात,
जिभेनेच नव्हे,
गोळ्यांनी,
तलवारी-भाल्यांनी,
बुलडोझरांनी,
काठ्या-लाठ्यांनी,
झुंडबळींनी,
बूटा-चपलांनी
हल्ले करताहेत,
मनूच्या अवलादी.
ते सनातन वर्णाश्रम धर्म,
सावरकरांच्या
हिंदू-पद-पाद-शाही,
हेडगेवार-गोळवलकरांच्या
ब्राह्मण्यशाहीचं
स्वप्न साकार करू पाहतायत.
ते फुले,पेरियार,आंबेडकर यांचा
वारसा उलथून टाकू इच्छितायत.
ते संविधान-लोकशाहीची
वाट लावू इच्छितात,
सनातनच्या नावाखाली...

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

सनातन के नाम पर..

वे दिनदहाड़े गौरी लंकेश को
मारे देते हैं, गोली 
महिषासुर को नायक मानने
झूट्ठा कहने के चलते
मोदी-शाह को 
कुलवर्गी की जान ले लेते हैं
वासवन्ना के वचनों को
उजागर करने के चलते
चुनौती दिया था, वासवन्ना ने
ब्राह्मण-मर्द सर्वोच्चता को
वे गोविंद पानसरे को
खत्म कर देते हैं
चितपावन पेशवा की
कूरता को उजगार 
करने के चलते
शिवाजी को ब्राह्मण-गाय
प्रतिपालक नहीं
ब्राह्मणवाद को चुनौती देने वाला
नायक के कहने के चलते
उन्होंने दाभोलकर को मौत की नींद
सुला दिया
सनातनी अंधविश्वास-पाखंड
को सरेआम बेपर्दा
करने के चलते 
वे अपने बिलों से निकल आएं हैं
नए पेशवाई राज में
जुबान से ही नहीं
गोलियों से
तलवारों-भालों से
बुलडोजरों से
डंडों-लाठियों से
लिंचिंग से  
चूते-चप्पलों से
वार करे रहें
मनु की संतानें
वे सनातन वर्णाश्रम धर्म की
सावरकर की 
हिंदू-पाद-पादशाही के
हेडगेवार-गोलवरकर के
ब्राह्मणशाही का
स्वप्न साकार करना
चाहते हैं
वे फुले, पेरियार. आंबेडकर की
विरासत को उलट देना चाहते हैं
वे संविधान-लोकतंत्र की
ऐसी-तैसी कर देना चाहते हैं
सनातन के नाम पर..

©सिद्धार्थ रामु
sidharth ramu
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने