सोपं आणि अवघड
किती सोपं असतं
मुलायम रजईत बसून
थोर काॅम्रेडसच्या कामाची
मापं काढणं,
त्यांच्या, त्यांच्या कुटुंबांच्या
हौतात्म्यावर संशय घेणं
कागद आणि कलम घेऊन
हल्ला माजवणं,
डोक्यात गड जिंकणं
लाल झेंड्याचे
खरे वारस होऊन जाणं,
किती सोपं असतं
थोर इतिहासावर चिखलफेक करणं,
पण किती अवघड असतं
त्यांच्यातला एक होऊन जाणं
त्या प्रदेशाकडे पाऊल उचलणं
जिथे मृत्यूची दलदल आहे,
अंधाऱ्या ओलसर रात्री,
जिथे हृदय मशालीसारखे जळते
उषःकाल घेऊन येणाऱ्या उजेडासाठी,
किती अवघड असतं
उपाशी राहून
भुकेकंगालांसाठी लढणं
किती अवघड असतं
थंडीत कुडकुडताना,
थंडगार मृत्यूसारख्या
संगिनी उचलून लढणं
किती अवघड असतं
आपल्या हाडांना समाजवादाच्या
पायात दगडासारखे वितळवून टाकणं
किती अवघड असतं
नावांच्या गर्दीत संघर्ष करताना
अनामिक ‘महान ध्येया’ साठी मरणं
किती सोपं आहे
मुलायम रजईत.....
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कितना आसान होता है
नर्म रज़ाई में बैठ
महान कामरेड्स के काम में
मीन-मेख निकलना,
उनकी,उनके परिवारों की
शहादतों पर शक़ जताना
कागज़ कलम में घमासान समाना,
दिमाग में दुर्ग जीतना
लाल झंडे के सच्चे वारिस हो जाना,
कितना आसान होता है
महान इतिहास पर कीचड उछालना,
लेकिन कितना मुश्किल होता है
उनमें से एक हो जाना
उस बीहड़ की ओर कदम उठाना
जहां मौत की दलदल है,
अँधेरी नम रातें ,
जहां जलते हैं हृदय मशाल की तरह
भोर के लाने उजाले,
कितना मुश्किल होता है
भूखे रहकर भूखों के लिए लड़ना
कितना मुश्किल होता है
ठंड में ठिठुरते हुए,
सर्द मौत सी संगीन उठाये लड़ना
कितना मुश्किल होता है
अपनी हड्डियों को समाजवाद की
नीव में पत्थर की तरह जज़्ब करना
कितना मुश्किल होता है
नामों की भीड़ में संघर्ष करते हुए
गुमनाम 'महान लक्ष्य' के लिए मरना
कितना आसान है
नर्म रज़ाई में.....
©देवेंद्र कुमार
Devender Kumar