अंत्ययात्रा

अंत्ययात्रा

अंत्ययात्रा

हे कोणाचे प्रेत ध्वजासारखे फडफडत निघाले आहे  
हे कोण होते जिवंत इथे  
ज्याला प्राप्त करुन मरणसुद्धा गर्वोन्नत होत चाललेय

कोणाचे प्रेत घेऊन जाताहेत इतके सारे लोक
सतावले गेलेल्यांच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या आक्रंदनात रडत  
एकमेकांच्या चित्कारांना मागे टाकत  
पुरुष, स्त्रिया,लहान मुले,वृद्ध 
आणि तरुण  
कोणासाठी इतक्या तत्परतेने बदलताहेत खांदे
कोण निघून जात आहे 
एवढ्या मोठ्या कुटुंबातून उठून अचानक

आपल्या यशाने आणि अपयशाने भेदरलेले आपण  
आपापल्या वाटांवरुन चालत दूरूनच पाहतो 
या अंत्ययात्रा  
आपण कदाचित कधी समजू शकू

अशी कोणती तार आहे 
जी या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांच्या हृदयातून जाते 
आणि मृताच्या आठवणीने महान अश्रूंची माळ बनवते
आपण कदाचित कधी समजू शकू
असे कोणते जीवन आहे ते
ज्याला मिळते असे उत्तुंग निष्ठापूर्ण मरण.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

शवयात्रा 

यह किसका शव जा रहा है 
पताके की तरह लहराता हुआ 
यह कौन था जिंदा यहाँ 
जिसे पाकर मृत्यु भी 
गर्वोन्नत हुई जा रही 

किसकी लाश लिए जा रहे हैं 
इतने सारे लोग 
सताए हुओं का दुख कहने की 
ध्वनियों में रोते हुए 
एक दूसरे की चीख-पुकार को 
पीछे छोड़ते 
मर्द, औरतें, बच्चे, बूढ़े और जवान 
किसके लिए इतनी तत्परता से बदल रहे हैं कंधे 
कौन चला जा रहा है इतने बड़े परिवार से 
उठकर अचानक 

अपनी सफलताओं और असफलताओं से भयभीत 
हम जो अपने-अपने रस्ते चलते दूर से देखते हैं ये शवयात्राएँ 
हम शायद कभी समझ पायें 

वह कौन सा एक तार है जो 
इन शवयात्रिओं के हृदय से गुजरता है 
और मृतक की याद में महान आंसुओं की 
माला बनाता है 
हम शायद कभी समझ पायें 
वह कौन सा जीवन है 
जिसे मिलती है ऐसी 
ऊँची ईमान भरी मौत। 

©विहाग वैभव
Vihag Vaibhav 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने