गाझा आणि बस्तर

गाझा आणि बस्तर

गाझा आणि बस्तर

तू किती मुले गमावलीस गाझा?  
बॉम्बने चिंधड्या झालेल्या मुलांच्या मृतदेहांची 
मी गणती करू शकलों नाही  
पण हजारोंच्या संख्येने,  
आणि तू बस्तर?  
तू सुद्धा आपली मुले गमावत आहेस ना?

मीही गणती करणं सोडून दिलंय  
हो, आत्ताच मी सहा महिन्यांच्या बाळाला गमावलं  
त्याच्यावर गोळी झाडली गेली होती.

बाप रे!  
तू आपले दुःख कोणाला सांगतोस बस्तर?

नदीला,  
जिचे अश्रू माझ्या दुःखाने कधी थांबतच नाहीत,  
आणि जंगलाला  
जो आपल्या कुशीत घेऊन माझी
पाठ थोपटत असतो.

गाझा!  
कोण आहे ज्याच्याबरोबर तू आपले दुःख वाटतोस?

जैतूनाच्या झाडांना,  
ज्यांच्या फळांत माझे अश्रू भरलेले असतात  
आणि समुद्राला,  
ज्याचे खारे अश्रू दुःखाने भरून उसळतात.

कोण आहे जो आम्हाला उजाड करत आहे बस्तर?  
माझ्यापेक्षा हे तुला जास्त चांगलं ठाऊक आहे गाझा!

काय आपण भेटू शकतो बस्तर?  
आपण एकत्र येऊन आपल्या मुलांसाठी शोक करू  
काही झाडं लावू, 
जंगलं आणि नवीन मुलंही  
आपली ही जमीन आपण ओसाड होऊ देणार नाही  
भेटशील ना बस्तर?

नक्कीच गाझा!  
आपण भेटू  
आपली लढाई मिळून लढण्यासाठी  
आपण नक्की भेटू.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

गाज़ा और बस्तर

तुमने कितने बच्चे खोए गाज़ा?
बमों से चिथड़े हुए बच्चों की लाशें मैं गिन नहीं सका
लेकिन हजारों में,
और तुम बस्तर?
तुम भी तो खो रहे हो अपने बच्चे?

मैंने भी गिनती करना छोड़ दिया है
हां, अभी ही मैने छमाही बच्ची को खोया है
गोली मारी गई थी उसे।

उफ्फ!
तुम अपना दुख किससे कहते हो बस्तर?

नदी से,
जिसके आंसू थमते नहीं हैं मेरे दुख से,
और जंगल से
जो अपनी आगोश में भर थपथपाता है मुझे।

गाज़ा!
कौन है, जिससे तुम बांटते हो अपना दुख?

जैतून के पेड़ों से,
जिसके फल मेरे आंसुओं से भरे होते हैं
और सागर से,
जिसके खारे आंसू दुख में भरकर पछाड़ मारते हैं।

कौन है जो हमें उजाड़ रहा है बस्तर?
तुमसे बेहतर यह कौन जानता है गाज़ा!

क्या हम मिल सकते हैं बस्तर?
हम मिलकर शोक करेंगे अपने बच्चों के लिए
रोपेंगे कुछ पेड़, जंगल और नए बच्चे भी
हम अपनी धरती बंजर नहीं होने देंगे
क्या तुम मिलोगे बस्तर?

बिल्कुल गाज़ा!
हम मिलेंगे 
अपनी लड़ाई को साझा करने के लिए
हम ज़रूर मिलेंगे।

©सीमा आझाद
Seema Azad 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने