हे हिडमाचे प्रेत जात आहे
पताक्यासारखे फडकत
लोकशाहीच्या ढिल्या तिरडीला बांधलेले
आमच्या ओसाड समजूतीची धूळ उडवीत
हे हिडमाचे प्रेत जात आहे
आपल्या हुंदक्यांनी
दिगंताला गदागदा हलवत
सतावल्या गेलेल्यांचा हा समूह
अद्याप सज्ज नाहीये विचारधारेच्या
शिळ्या चर्चेकरिता
आपल्या नद्यांना घरी एकट्या सोडून
डोळ्यात बादलीभर पाणी
घेऊन आलेल्या बायका
आपल्या जंगलांना
'जरा थांबा,खेळ पूर्ण नाही झाला'
सांगून आलेली पोरं
आपल्या जमिनी बेवारस सोडून आलेले
आदिम वृद्ध हिडमाला घेऊन जाताहेत
त्यांच्या मागोमाग जात आहे एक नदी,
एक जंगल आणि
अनेकजणांच्या जीवन-शक्यता
हिंसा-अहिंसेवर चर्चा करणारे आम्ही
या अंत्ययात्रेतले सोबती
कदाचितच कधी समजू शकू की
बत्तीस दातांच्या मध्ये
एकटी जीभ कशी शाबूत राहाते ते
आणि कसा एक अश्रू
आक्रोशाच्या आगीत ओतून
बंदूकीची गोळी बनत असतो
आम्ही जे समजतोय
हत्येच्या सगळ्या बाजू म्हणजे
माझ्या भाषेतल्या कवींनो, या!
शब्दांच्या या कच्च्या वाटेवरुन चालत
काही अंतरापर्यंत आपणही
आपला खांदा बदलू या.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हिडमा की शवयात्रा
यह हिड़मा का शव जा रहा है
पताका की तरह लहराता हुआ
लोकतंत्र की ढीली तीकठी से बँधा
हमारी ऊसर समझदारियों का धूल उड़ाता हुआ
यह हिडमा का शव जा रहा
अपनी सिसकियों से दिगंत को कंपा देते
सताए हुओं का यह हुजूम
अभी तैयार नहीं विचारधारा की बासी बहस के लिए
अपनी नदियों को घर पर अकेले छोड़कर
आँखों में बाल्टीभर पानी लेकर आई हुईं स्त्रियां
अपने जंगलों को ‘जरा रुकना, खेल पूरा नहीं हुआ है’
-कहकर आए हुए बच्चे
अपनी ज़मीनों को लावारिस छोड़कर आए आदिम बूढ़े
हिडमा को लिए जा रहे
उनके पीछे पीछे जा रही एक नदी, एक जंगल और बहुतों की जीवन- संभावनाएँ
हिंसा-अहिंसा पर विमर्श करते हम
इस शवयात्रा के बग़लगीर
शायद ही कभी समझ पाएँ कि
बत्तीस दाँतों के बीच
एक अकेली जीभ कैसे सलामत रहती है
और कैसे एक आँसू आक्रोश की आग में ढलकर
बन्दूक की गोली बनता है
हम जो समझते हैं हत्या के चतुर्दिक अर्थात
मेरी भाषा के कवियो, आओ!
शब्दों की इस कच्ची सड़क पर चलते
कुछ दूर तक हम भी अपना कंधा बदलें।
©विहाग वैभव
Vihag Vaibhav