आपल्याला
एका अशा समाजाच्या निर्मितीसाठी
प्रयत्न करायला हवेत
ज्यात सत्ता नसेल
सत्तेचा अर्थ समजून घ्या
सत्तेचा अर्थ आहे निर्णय घेण्याची आणि
त्याची अंमलबजावणी करण्याची ताकद.
कामगार आणि मालक यांच्यात मालक
सत्ताधारी असतात.
शहरी आणि ग्रामीण यांच्यात शहरी
सत्ताधारी असतात.
अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यात
बहुसंख्याक सत्ताधारी असतात.
पुरुष आणि स्त्री यांच्यात पुरुष सत्ताधारी असतो.
सवर्ण आणि दलित यांच्यात
सवर्ण सत्ताधारी असतात.
सरकार आणि जनता यांच्यात सरकार सत्ताधारी असते.
काही लोक
सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करतात,
काही लोक सत्तेच्या समान वाटपाविषयी बोलतात
पण सत्ता ही एक वाईट गोष्ट आहे,
कारण सत्तेच्या अस्तित्वासाठी
कोणाचे तरी कमकुवत असणे आवश्यक असते.
सत्ता कुठल्याही स्वरूपात असो,
ती कुणाकडेही असो,
ती नक्कीच कुणाला तरी कमकुवत नक्कीच बनवेल.
म्हणून सत्तेविना समाज कसा चालेल,
यासाठी प्रयत्न करावे लागतील
सत्तामुक्त समाज तेव्हाच शक्य आहे
जेव्हा वरती लिहिलेल्या
प्रत्येक नात्यात समानता हे तत्त्व असेल.
पण
जे आज सत्ताधारी आहेत,
ते सत्ता हातातून जाऊ देणार नाहीत.
म्हणून सत्ताधारी नेहमी समानतेला विरोध करतात
म्हणून न्यायप्रिय लोक नेहमी दुर्बलांच्या बाजूने उभे राहतात आणि समतेचा आग्रह धरतात.
म्हणून सत्ता नेहमी समतेचा,समानतेचा प्रयत्न करणाऱ्यांवर चिडत असते,
म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता की
हिंदू आणि मुसलमान हे समान नागरिक आहेत
किंवा ब्राह्मण आणि दलितांचे अधिकार समान आहेत
तेव्हा तुम्हाला लगेच शिवीगाळ सुरू होते.
तुम्ही कामगार,आदिवासी किंवा
शेतकऱ्याची बाजू घेतली
तर सरकार तुम्हाला तुरुंगात टाकते,
कारण कामगार,आदिवासी किंवा शेतकऱ्यांच्या दारिद्र्यामुळे श्रीमंत भांडवलदार मजेत आहेत.
आज तुरुंग हे अशा लोकांनी भरलेले आहेत
ज्यांनी कामगार किंवा
आदिवासी जनतेची बाजू घेतली
तुम्ही सत्तेच्या बाजूने राहिलात तर
तुम्ही मजेत राहता,राहू शकता.
म्हणून अनेकदा बुद्धिजीवी,
साहित्यिक गप्प बसतात
पण समाज
सत्तामुक्त होण्याच्या प्रयत्नात सदैव गुंतलेला असतो.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी टिपण
हमें एक ऐसे समाज के लिए कोशिश करनी है
जिसमें सत्ता नहीं होगी
सत्ता का अर्थ समझिये
सत्ता का मतलब है फैसला लेने और उसे लागू करने की ताकत
मज़दूर और मालिक के बीच मालिक सत्तावान है
शहरी और ग्रामीण के बीच शहरी सत्तावान है
अल्पसंख्यक और बहुसंख्यक के बीच
बहुसंख्यक सत्तावान है
मर्द और औरत के बीच मर्द सत्तावान है
सवर्ण और दलित के बीच सवर्ण सत्तावान है
सरकार और जनता के बीच सरकार सत्तावान है
कुछ लोग सत्ता पर कब्ज़ा करने की कोशिश करते हैं
कुछ लोग सत्ता के बंटवारे की बात करते हैं
लेकिन सत्ता तो एक बुराई है
क्योंकि सत्ता के अस्तित्व के लिये किसी का कमज़ोर होना ज़रूरी है
सत्ता किसी भी रूप मे रहे
किसी के भी पास रहे
वह किसी को कमज़ोर ज़रूर बनायेगी
इसलिये बिना सत्ता के समाज कैसे चले
इसकी कोशिश करनी पड़ेगी
सत्ता मुक्त समाज तभी हो सकता है
जब ऊपर लिखे प्रत्येक सम्बन्ध के बीच बराबरी हो
लेकिन जो आज सत्तावान है
वह सत्ता हाथ से जाने नही देना चाहता
इसलिये सत्ताधारी सदैव समानता का विरोध करता है
इसलिये न्यायप्रिय लोग हमेशा कमज़ोर की तरफ रहते हैं और समानता की कोशिश करते हैं
इसलिये सत्ता हमेशा समानता की कोशिश करने वालों से चिढ़ती है
इसलिये जैसे ही आप कहते हैं हिन्दु और मुसलमान बराबर के नागरिक हैं
या ब्राह्मण और दलित के अधिकार एक बराबर हैं
आपको तुरन्त गाली मिलने लगेगी
आप मज़दूर, आदिवासी या किसान का साथ देंगे
तो आपको सरकार जेल में डाल देगी
क्योंकि मज़दूर, आदिवासी या किसान की बदहाली की वजह से
अमीर पूंजीपति मजे में हैं
आज जेलें उन लोगों से भरी हुई हैं
जिन्होंने मज़दूरों या आदिवासियों की तरफदारी करी
आप सत्ता की तरफ रहते हैं
तो आप मज़े में रहते हैं
इसलिये अक्सर बुद्धिजीवी, साहित्यकार चुप हो जाते हैं
लेकिन समाज सत्तामुक्त होने की कोशिश में लगा रहता है।
©हिमांशु कुमार
Himanshu Kumar