पुण्यातील एका स्मशानभूमीत
दुपारचे ३ वाजले होते.
‘रोहन’ (वय ३५ वर्षे),
जो अमेरिकेतील एका
साॅफ्टवेअर कंपनीत
मोठ्या पदावर होता,
तो आता फ्लाइटमधून उतरून थेट
स्मशानभूमीत पोहोचला होता.
त्याचे वडील,
‘सदाशिवराव’ (वय ७५ वर्षे),
काल रात्री त्यांचे निधन झाले होते.
रोहनच्या हातात महागडे लॅपटॉप बॅग होती
आणि डोळ्यांवर रे-बॅन गाॅगल.
त्याला घाम येत होता आणि तो
पुनःपुन्हा घड्याळात बघत होता.
तिथे ‘मोक्ष इव्हेंट मॅनेजमेंट’
(अंत्यसंस्काराची एजन्सी) चा कर्मचारी
‘सुमित’ उभा होता.
सुमितने
सगळी तयारी करून ठेवली होती.
लाकडे रचली होती,
भटजी बोलावला होता,
आणि सदाशिवरावांच्या पार्थिवाला
स्नान घालून तयार ठेवले होते.
रोहन आला.
त्याने वडिलांच्या चेहऱ्यावर
एक नजर टाकली.
डोळ्यांतून एक-दोन अश्रू निघाले.
त्याने सुमितला विचारले:
“मिस्टर सुमित,
सगळे तयार आहे ना?
मला सहा वाजताच्या
रिटर्न फ्लाइटला जायचे आहे.
उद्या
माझी खूप महत्वाची मीटिंग आहे.
प्लीज लवकर करा.”
सुमितला आश्चर्य वाटले.
ज्या वडिलांनी या मुलाचे पालनपोषण करून मोठे केले,
त्या वडिलांच्या चितेजवळ थांबण्यासाठी
या मुलाकडे अवघे
तीन तासही नव्हते.
सुमितने शांतपणे डोके हलवले.
विधी पूर्ण झाला.
रोहनने मुखाग्नी दिली.
धुराचे लोट आकाशात उडाले.
रोहनने सुमितला बाजूला नेले
आणि चेकबुक काढले.
“सुमित, धन्यवाद.
तुम्ही चांगली व्यवस्था केली.
तुमचे बिल किती झाले?
५० हजार? १ लाख?
रक्कम सांगा, मी आत्ताच चेक देतो.
मी पुन्हा येऊ शकणार नाही,
अस्थी विसर्जनही
तुम्हीच करून द्या.”
सुमितने रोहनकडे पाहिले.
त्याच्या चेहऱ्यावर
एक विचित्र हसू होते.
त्याने खिशातून एक जुनी फाइल काढली आणि
रोहनच्या हातात दिली.
“साहेब, बिल देण्याची गरज नाही.
तुमचे बिल ‘पेड’ आहे.”
रोहन आश्चर्यचकित झाला.
“पेड?
कोणी पैसे भरले?
काय माझ्या काकांनी?”
सुमित म्हणाला:
“नाही साहेब.
पाच वर्षांपूर्वी सदाशिवराव सर
(तुमचे वडील)
आमच्या ऑफिसला आले होते.
ते खूप आजारी होते,
नीट चालताही येत नव्हते.
त्यांनी मला विचारले होते —
‘तुमचे पॅकेज काय आहे?
माझ्या मुलाला त्रास होऊ नये,
सगळी व्यवस्था कराल ना?’
आम्ही त्यांना पॅकेज सांगितले.
त्यांनी त्याच दिवशी ५०,००० रुपये
अॅडव्हान्स जमा केले होते.
आणि ही ‘चिठ्ठी’ देऊन
मला सांगितले होते —
‘माझा मुलगा आला
तर त्याला ही चिठ्ठी द्या.
आणि जर तो येऊ शकला नाही,
तर तुम्हीच माझे अंत्यसंस्कार करा.’”
सुमितने ती चिठ्ठी रोहनला दिली.
रोहनने
थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली.
त्यात सदाशिवरावांच्या थरथरत्या अक्षरांत लिहिले होते:
“प्रिय रोहन,
बेटा,
मला माहीत आहे
तू खूप व्यस्त असतोस.
अमेरिकेत तुला श्वास घेण्याचीही फुरसत नसते.
मला ठाऊक आहे की
माझ्या मृत्यूची बातमी
ऐकून तुला काळजी वाटेल.
‘रजा मिळेल का?
तिकीट मिळेल का?
मीटिंगचे काय?’
हे प्रश्न तुझ्या मनात येणार.
बेटा, तुझा वेळ आणि
तुझे करिअर खूप महत्वाचे आहेत.
मी तुला याचसाठी वाढवले की
तू जग जिंकावेस.
एका म्हाताऱ्याच्या देहासाठी
तू स्वतःचे नुकसान करू नकोस.
म्हणून मी माझ्या मृत्यूची व्यवस्था आधीच केली आहे.
एजन्सीला पैसे दिले आहेत.
ते सगळं करतील.
तू येऊ शकलास तर चांगले,
न येऊ शकलास तरी
माझी काही तक्रार नाही.
फक्त एक विनंती आहे —
जेव्हा मी तुला लहानपणी शाळेत सोडायला जात असे,
तेव्हा तुझा हात कधी सोडला नव्हता.
आज जेव्हा तू मला अग्नी देशील,
तेव्हा तुझा हात अजिबात
थरथरू नये.
लवकर माघारी निघ.
तुझी बायको
वाट बघत असेल.
तुझा,
पापा.”
चिठ्ठी वाचताच रोहनच्या हातातले
चेकबुक चिखलात पडले.
त्या स्मशानात,
जिथे
लाकडे जळण्याचा आवाज येत होता…
तिथे आता रोहनचा अहंकार आणि
करिअरचा अभिमान जळून राख झाला होता.
तो गुडघ्यावर बसला.
धाय मोकलून ओरडला —
“पापा…!! मला माफ करा!”
त्याने सुमितचे पाय धरले.
“सुमित,
मला अमेरिकेला जायचे नाही.
मला माझ्या पापांसोबत राहायचे आहे!
मी करोडो रुपये कमावले,
पण मी तर खरा भिकारी निघालो!
माझ्या पापांनी मरतानाही
माझ्या मीटिंगची काळजी केली…
आणि मी मात्र
त्यांच्या अंतिम दर्शनाचाही हिशोब लावत होतो?”
त्या दिवशी रोहन फ्लाइट पकडू शकला नाही.
तो तिथेच,
त्या जळत्या चितेसमोर रात्रभर बसून राहिला.
कारण त्याला समजले होते —
‘प्री-पेड’ फक्त सिम कार्ड असू शकते,
बापाचे प्रेम नाही.
बापाचे प्रेम ‘अनलिमिटेड’ असते,
आणि त्याची किंमत
जगातील कोणतेही चलन चुकवू शकत नाही.
तू जगात कितीही मोठा झालास तरी,
कितीही पैसा कमावलास तरी…
ज्या माता-पित्यांनी तुझे पालनपोषण केले,
बालपण जपले
त्यांच्या अंतिम प्रवासात
तू साथ देण्यापासून कधीच मागे हटू नकोस.
एजन्सी अंत्यसंस्कार करू शकते,
पण अश्रू एजन्सीचे नसतात —
ते फक्त रक्ताच्या नात्याचेच असतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
पिता का प्यार
पुणे के एक बड़े श्मशान घाट में दोपहर के 3 बजे थे।
‘रोहन’ (उम्र 35 वर्ष),
जो अमेरिका की एक बड़ी सॉफ्टवेयर कंपनी में वाइस प्रेसिडेंट था,
अभी-अभी फ्लाइट से उतरकर सीधे श्मशान घाट पहुँचा था।
उसके पिता,
‘सदाशिवराव’ (उम्र 75 वर्ष),
कल रात गुजर गए थे।
रोहन के हाथ में महंगा लैपटॉप बैग था और आँखों पर रेबैन का चश्मा।
उसे पसीना आ रहा था और वह बार-बार घड़ी देख रहा था।
वहाँ ‘मोक्ष इवेंट मैनेजमेंट’ (अंतिम संस्कार करने वाली एजेंसी) का कर्मचारी
‘सुमित’ खड़ा था।
सुमित ने सारी तैयारी कर रखी थी।
लकड़ियाँ सजा दी थीं,
पंडित बुला लिया था, और सदाशिवराव के पार्थिव शरीर को स्नान कराकर तैयार रखा था।
रोहन आया।
उसने पिता के चेहरे की ओर एक नजर डाली।
आँखों से एक-दो आँसू निकल आए।
उसने सुमित से पूछा:
“मिस्टर सुमित,
सब तैयार है ना?
मुझे 6 बजे की रिटर्न फ्लाइट पकड़नी है।
कल मेरी बहुत जरूरी मीटिंग है।
प्लीज़ जल्दी कराइए।”
सुमित को आश्चर्य हुआ।
जिस पिता ने इस बेटे को पाल-पोशकर बड़ा किया,
उस पिता की चिता के पास रुकने के लिए इस बेटे के पास तीन घंटे भी नहीं थे।
सुमित ने शांत होकर सिर हिलाया।
विधि पूरी हुई।
रोहन ने मुखाग्नि दी।
धुएँ के गुबार आसमान में उठ गए।
रोहन ने सुमित को अलग ले जाकर चेकबुक निकाली।
“सुमित, धन्यवाद।
आपने अच्छी व्यवस्था की।
आपका बिल कितना हुआ? 50 हजार? 1 लाख?
राशि बताइए,
मैं अभी चेक दे देता हूँ।
मैं दोबारा नहीं आ पाऊँगा,
अस्थि विसर्जन भी आप ही करवा दीजिए।”
सुमित ने रोहन की ओर देखा।
उसके चेहरे पर एक अजीब-सी मुस्कान थी।
उसने जेब से एक पुरानी फाइल निकाली और रोहन के हाथ में दी।
“साहब, बिल देने की जरूरत नहीं है।
आपका बिल ‘पेड’ है।”
रोहन चौंक गया।
“पेड?
किसने भरा पैसा?
क्या मेरे चाचा ने?”
सुमित बोला:
“नहीं साहब।
पाँच साल पहले सदाशिवराव जी (आपके पिता) हमारे ऑफिस आए थे।
वे बहुत बीमार थे, ठीक से चल भी नहीं पा रहे थे।
उन्होंने मुझसे पूछा था —
‘आपका पैकेज क्या है?
मेरे बेटे को तकलीफ न हो, सब इंतज़ाम कर देंगे ना?’
हमने उन्हें पैकेज बताया।
उन्होंने उसी दिन 50,000 रुपये एडवांस जमा कर दिए थे।
और यह ‘चिट्ठी’ मुझे देकर कहा था —
‘मेरा बेटा आए तो उसे यह दे देना।
और अगर वह न आ सके,
तो आप ही मेरा अंतिम संस्कार कर देना।’”
सुमित ने वह चिट्ठी रोहन को दी।
रोहन ने काँपते हाथों से चिट्ठी खोली।
उसमें सदाशिवराव के काँपते अक्षरों में लिखा था:
“प्रिय रोहन,
बेटा,
मुझे पता है तुम बहुत व्यस्त हो।
अमेरिका में तुम्हें साँस लेने की भी फुर्सत नहीं होती।
मुझे मालूम है कि
मेरी मृत्यु की खबर सुनकर तुम्हें चिंता होगी।
‘छुट्टी मिलेगी या नहीं?
टिकट मिलेगा या नहीं?
मीटिंग का क्या होगा?’
ये सवाल तुम्हारे मन में आएँगे।
बेटा, तुम्हारा समय और तुम्हारा करियर बहुत महत्वपूर्ण है।
मैंने तुम्हें इसलिए पाला है कि तुम दुनिया जीत सको।
एक बूढ़े की लाश के लिए तुम अपना नुकसान मत करना।
इसलिए मैंने अपनी मृत्यु की व्यवस्था पहले ही कर दी है।
एजेंसी को पैसे दे दिए हैं।
वे सब कर देंगे।
तुम आ सको तो अच्छा है,
न आ सको तो भी मुझे कोई शिकायत नहीं।
बस एक विनती है —
जब मैं तुम्हें बचपन में स्कूल छोड़ने जाता था,
तो तुम्हारा हाथ कभी नहीं छोड़ा था।
आज जब तुम मुझे अग्नि दो,
तो तुम्हारा हाथ काँपना नहीं चाहिए।
जल्दी वापस चले जाना।
तुम्हारी पत्नी इंतज़ार कर रही होगी।
तुम्हारा,
पापा।”
चिट्ठी पढ़ते ही रोहन के हाथ से चेकबुक कीचड़ में गिर गई।
उस श्मशान में,
जहाँ लकड़ियों के जलने की आवाज आ रही थी…
वहाँ अब रोहन का अहंकार और करियर का घमंड जलकर राख हो चुका था।
वह घुटनों के बल बैठ गया।
चिल्लाया —
“पापा…!! मुझे माफ कर दीजिए!”
उसने सुमित के पैर पकड़ लिए।
“सुमित,
मुझे अमेरिका नहीं जाना।
मुझे अपने पापा के साथ रहना है!
मैंने करोड़ों रुपये कमाए,
पर मैं तो असली भिखारी निकला!
मेरे पापा ने मरते समय भी मेरी मीटिंग की चिंता की…
और मैं उनके अंतिम दर्शन का भी हिसाब लगा रहा था?”
उस दिन रोहन फ्लाइट नहीं पकड़ सका।
वह वहीं,
जलती चिता के सामने रात भर बैठा रहा।
क्योंकि उसे समझ आ गया था —
‘प्री-पेड’ सिर्फ सिम कार्ड हो सकता है,
पिता का प्रेम नहीं।
पिता का प्रेम ‘अनलिमिटेड’ होता है,
और उसकी कीमत दुनिया की कोई भी करंसी नहीं चुका सकती।
आप दुनिया में कितने भी बड़े बन जाएँ,
कितना भी पैसा कमा लें…
लेकिन जिन माता-पिता ने आपका बचपन सँवारा,
उनके अंतिम सफर में साथ देने से कभी पीछे मत हटिए।
एजेंसी अंतिम संस्कार कर सकती है,
लेकिन आँसू एजेंसी के नहीं होते —
वे अपने खून के रिश्तों के ही होते हैं।
लेखक
अज्ञात