सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या!

किर्तनाच्या नावाखाली सुरु विषपेरणी
प्रचारक आफळ्याची नीच संघकरणी
वारकरी धर्म आणि परंपरा नासवूनी,
हा थांबणार जणू!

भिडे-पोंक्षे-आफळ्याची दुष्ट प्रभावळ
देशबुडव्या औलादी या ओकती गरळ
ज्ञानोबा-तुकोबांच्या बदनामीची सरळ,
घेतली सुपारी!

बायाबापडे जमती ऐकण्या किर्तन
डोळ्यापुढे उलगडे नवे नथुरामायण
बापूंच्या खून्याचे उघड उदात्तीकरण,
विकृतांकरवी!

जीभ जळो-गळो-झडो ऐशा मुर्दाडांची
अळ्या-किडे पडो,रया जावो थोबाडाची
आव आणी बुवाचा,कीव नको द्वाडाची,
या कदापि ही!

पेशवाईने पाळलेले संघश्वान पिसाळले
असत्याचे भ्रमजाल समाजमन घुसळले
देशावर वैदिकांचे नव अरिष्ट कोसळले,
सांप्रतकाळी!

मानवतेच्या गंगेत मिसळे गटारीचे पाणी
सनातनी जंत करती विकृत संतांची वाणी
पाताळयंत्री गाती आता खोटीनाटी गाणी,
समरसतेची!

विठूराया तुझ्या दारी वाढली विषवल्ली
संतांच्या सत्धर्माची इथे रोज पायमल्ली
मंबाजी उडवतो भाव-भक्तीची खिल्ली,
निर्लज्जपणे!

मना-मेंदूवरती भाकड थोतांडे थोपती
शतकानुशतके वैदिकांची हीच कपटनीती
गायपट्ट्यापरी नासवली ही मराठीमाती,
पुरोगामीत्वाची!

खुनशी लांडग्यांची उभी नेभळट फौज
वाढतच चाललेला उपद्रव आणि माज
तुकोबांची घ्या काठी चला होऊ सज्ज,
या नाठाळांसाठी!

भरत यादव
Bharat Yadav 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने