अलविदा लहान बाळानों!

अलविदा लहान बाळानों!

अलविदा लहान बाळांनों!

तुम्ही आम्हांला 
मागे सोडून गेलायत या जगात, 
जिथे तुम्हाला मारणाऱ्यांना तारणहार, 
मुक्तिदाते म्हटले जाते आणि 
बॉम्ब हल्ले पचवणाऱ्यांना अतिरेकी  

जिथे पहिला बॉम्ब टाकणाऱ्यांना स्वसंरक्षणात 
कृती करत असल्याचे सांगितले जाते  
आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणारे, 
प्रत्युत्तर देणारे आक्रमक ठरतात  

जिथे 
प्रत्येक गोष्ट उफराटी आहे  

जिथे अणुबॉम्ब टाकणाऱ्या, 
निष्पापांची हत्या करणाऱ्या, 
भूमी हडपण्यासाठी नरसंहार करणाऱ्या देशांना 
पीडित म्हटले जाते  
आणि ज्यांच्या जमिनी, 
घरे,आयुष्ये उद्ध्वस्त झाली 
त्यांना दहशतवादी म्हणतात  

जिथे 
माध्यमे पीडितांना दोषी ठरवतात  
गोरे नसलेल्या लोकांच्या मरणाला 
सामान्य,साधारण बनवतात  
आणि पूर्व-वसाहतवादी राष्ट्रांची माध्यमेही 
नव-वसाहतवाद्यांच्या बाजूने 
उभी राहतात  
त्या नव-वसाहतवादी 
भूमीचोरांच्या
खुन्यांच्या खोटारड्या गोष्टी
पुनःपुन्हा सांगत राहतात  

जिथे बालिकाशोषक, 
मांसभक्षक, बलात्कारी, 
नरसंहार करणारे 
वायझेड जागतिक नेते 
म्हणून सन्मानित होतात  
आणि सज्जन लोक 
तुरुंगात खितपत पडतात,
खोट्या अपराधांसाठी 
फासावर लटकवले जातात  

जिथे एपस्टाइन वर्ग 
हा सुसंस्कृत समजला जातो  
आणि आम्ही 
गव्हाळरंगी क्रुरकर्मे ठरतो!  

लहानग्या बाळांनों!
कदाचित तुम्ही 
एखाद्या उत्तम जगात गेला 
असाल, 
माझ्या गोडूल्यांनो!
मला आशा वाटते की 
तुम्हाला तुमचे 
मुलायम मांस 
जळताना जाणवले नसेल  
आणि तुम्ही शांतपणे गाढ निद्रेत
शिरल्या असाल.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ इंग्रजी कविता

Goodbye little babies 

You left us behind in a world where the people who killed you are called the saviours, the liberators 
And the people who are bombed are called extremists

Where people who drop first bombs are said to be acting in self defense
And people who try to defend themselves and dare to retaliate are called the aggressors 

Where every narrative is topsy turvy 

Where countries with histories of nuking innocent people, genociding populations to grab their lands are the victims 
and the people whose lands, homes, lives were decimated are called terrorists 

Where media villifies the victims
Normalises the deaths of the people who are not white 
And even the media of erstwhile colonised nations stand with the neo-colonisers 
And parrot the lies of the neo-colonial land grabbers thieves murderers

Where paedophile flesh eaters rapists genocidal maniacs are world leaders hailed by all
And good people rot in jails and are executed for imaginary crimes 

Where the Epstien class is the civilised lot 
And we are the brown barbarians 

Maybe you went to a better world my sweet babies
I hope you didn't feel your soft flesh burn and you peacefully went into deep sleep.

©Monami Basu
मोनामी बसु

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने