🚩
षंढयुगी ऐसे,मातले गा जंत
म्हणवती संत,स्वतःलाच!
एक नीच ऐसा,बरळतो नित्य
ओकतो असत्य,रात्रंदिन!
गायपट्टा झाला,अवघा मुलूख
विद्वेषाचे डंख, मारताती!
नासवला देश,कथा वाचकांनी
भगव्या कफनी,पांघरुन!
धूर्त लबाडांची, लायकी ती काय
हरामची साय, ओरपती!
ज्ञाना-तुकयाचे, नका घेऊ नाव
डबक्यात धाव,बेडकांची!
वारकरी धर्मा, लावू नका कीड
काढतील धिंड, पंढरीत!
देहू आळंदीस, फिरकू नको रे
धंदे तुझे सारे, सर्वज्ञात!
अगा पुढार्यांनी, पोसली जमात
उकीरडे हूंगत, फिरताती!
वर्णवर्चस्वाचा, दाखवती ताठा
मिरवती खोटा, बडेजाव!
आयत्या पिठाची, झाली गा सवय
हाॅटेलांची सोय, अलिशान!
पैशाला पासरी, ऐसे कितीतरी
व्यास किंवा गिरी, निपजती!
हीन लेखू नको, ज्ञानेश्वरी-गाथा
संतांची महत्ता, ठावी आम्हां!
जातश्रेष्ठत्वाच्या, नकोत वल्गना
वारकरी बाणा, समतेचा!
दुष्ट कर्मठांची, जरी आज सत्ता
उन्नतच माथा, विवेकाचा!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav