इराण जिंदाबाद

इराण जिंदाबाद

इराण जिंदाबाद!

युद्धविरोधी कविता लिहिण्यापेक्षा
उत्तम,
मी इराण जिंदाबाद लिहीन
मी पॅलेस्टीन जिंदाबाद लिहीन!

मला पश्चाताप वाटतो की
हिंदीशिवाय येत नाही अन्य भाषा
नाहीतर मी 
माहित असलेल्या प्रत्येक भाषेत
पुनःपुन्हा लिहिले असते
इराण जिंदाबाद!

कोण हरणार कोण जिंकणार 
हे कुणाच्या हे म्हणण्याने ठरणार नाही की 
युद्ध करु नका आणि 
आता जर का युद्ध होत आहे
मी प्रत्येक भाषेत लिहावे म्हणतोय
इराण जिंदाबाद!
सिंधू खोर्‍यातील-संस्कृतीतील 
त्या भाषेतसुद्धा लिहिले जावे
इराण जिंदाबाद!
जी अद्यापपर्यंत 
वाचू जाऊ शकलेली नाहीए!

सांकेतिक भाषांमध्येही नोंदवले जावे
इराण जिंदाबाद!

पशूपक्ष्यांच्या,झाडांच्या आणि
त्यांच्या सळसळणार्‍या पानांच्या,
नद्यांच्या व समुद्रांच्या,
पर्वतांच्या,वाळवंटांच्या भाषांमधून
लिहिले जावे
इराण जिंदाबाद!

दूरस्थ तार्‍यांच्या,नक्षत्रांच्या
अजूनही दूरच्या ग्रहांची जी कुठली
लिपी असेल आणि जगभरातल्या
सर्व संस्कृतींच्या धूळीत 
ज्या आपल्या भाषा आणि लिप्या 
विस्मरुन गेल्यात
त्यातही लिहिले जावे
इराण जिंदाबाद!

मी तर कसलीच लढाई लढू शकत नाही
त्यातही मी हिंसेला योग्य मानत नाही
बाॅम्ब फेकणे,पूल उद्धवस्त करणे
हे कधीच बरोबर मानत नाही
तोफा आणि युद्ध करणार्‍या विमानांचा तिरस्कार 
वाटतो मला

तरीही
आज युद्धविरोधी कविता न लिहून
मी लिहितोय,
लढवय्या इराण जिंदाबाद!
जखमी इराण जिंदाबाद!
इराण जिंदाबाद

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

ईरान जिन्दाबाद!

युद्ध विरोधी कविता लिखने से बेहतर है
मैं ईरान जिन्दाबाद लिखूँ
मैं फिलिस्तीन जिन्दाबाद लिखूँ!

मुझे अफसोस है कि हिन्दी के अलावा 
नहीं आती कोई भाषा
नहीं तो मैं जानने वाली हर जुबान में
बार बार लिखता 
ईरान जिन्दाबाद! 

कौन हारेगा कौन जीतेगा यह किसी के 
यह कहने से तय नहीं होगा कि युद्ध नहीं करो
और अब जब कि युद्ध हो रहा है
मैं हर भाषा में लिखना चाहता हूँ 
ईरान जिन्दाबाद
सिंधु घाटी की उस भाषा में भी
लिखा जाये
ईरान जिन्दाबाद
जो अभी तक पढ़ी नहीं गई! 

संकेत भाषाओं में भी दर्ज हो
ईरान जिन्दाबाद! 

पशुओं चिड़ियों पेड़ों और उनकी पत्तियों 
नदियों और समुद्रों 
पहाड़ों मरुस्थलों की भाषा में 
लिखा जाये 
ईरान जिन्दाबाद!

दूर के तारों नक्षत्रों 
और भी दूर के ग्रहों की जो भी लिपि हो 
और संसार की सभी सभ्यताओं की धूल 
जो गई हों अपनी भाषा और लिपि भूल 
उसमें भी लिखा जाये
ईरान जिन्दाबाद! 

जबकि मैं लड़ नहीं सकता कैसी भी लड़ाई
जबकि हिंसा को उचित नहीं समझता
बम गिराने पुलों को तोड़ देने को कतई ठीक नहीं मानता
तोपों और युद्ध करने वाले विमानों से नफरत है मुझे

फिर भी 
आज युद्ध विरोधी कविता नहीं लिख कर 
मैं लिखता हूँ
योद्धा ईरान जिन्दाबाद!
घायल ईरान जिन्दाबाद!
ईरान जिन्दाबाद! 

©बोधिसत्व
Bodhi Sattva 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने