आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
भुंकती अजूनी
मनुस्मृतीखोर
पोंक्षेचा भिकार
युक्तीवाद!

जातश्रेष्ठत्वाचे
गाती गुणगान
समतेची वीण
उसवती!

शोषणशाहीचे
निर्लज्ज गोडवे
पंडे आणि बडवे
सुखावती!

भाजपाचा संघ
संघाचा भाजप
लेक आणि बाप
सारखेच!

लखलाभ तुम्हा
मनूचा कायदा
गुलामीचा फंदा
बहूजना!

मनूचा मुडदा
कधीचा गाडला
कोथळा काढला
अगोदर!

चातुर्वर्ण्याचे बा
रचले थडगे
फोडले गाडगे
विषमतेचे!

पुनःपुन्हा जाळू
मनूचा सापळा
शोषणाचा काळा
अध्यायच!

मनुसमर्थकांचे
नथीतून बाण
डोळा संविधान
खुपते गा!

मनूचे गोडवे
गातात भडवे
राडीत गाढवे
लोळताती!
🚩          -भरत यादव
           Bharat Yadav

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने