आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!
🚩
विषगुरुंची प्रथम पसंती
पक्षप्रचारधर्म निभावती
जगाची होईना का माती
देणे-घेणे नाही!

आणून विषगुरुचा आव
फादरलॅंडकडे घेती धाव
मदरलॅंडचे अवघे नाव
अगा घालविती!

विषगुरु ट्रंपोबाचा चेला
लावला छानच सापळा
मासा लागला गळाला
युद्धखोरांच्या!

पदप्रतिष्ठेचा विसर पडला
लगा लगा गेले भेटीला
गळाभेटी-मिठीचा केला
तोच जुना ड्रामा!

पदक अडकवले गळ्यात
जगास लोटले युद्धखाईत
देशाचे कशात दडले हित
हे ही कळेना!

ज्यू-भूमीत खेळ रंगलेला
महासत्ता नाचवी नाच्याला
फाईलीत खोलवर रुतलेला
एपस्टिनच्या!

सुरु झाले युद्ध घनघोर
विषगुरु तरी गप्पगार
मुस्लिमद्वेषाची किनार
जाणवते स्पष्ट!

हिंद-पर्शियाचे प्राचीन नाते
विषगुरु विसरुन गेले होते
रुपयाची पतंग गोते खाते
डाॅलरपुढती!

सर्वोच्च नेत्यास गमावले
तरी हत्यार नाही टाकले
इराण मुळीच ना झुकले
महासत्तेपुढे!

निष्पापांवर चढवले हल्ले
क्षेपणास्त्रांचे वर्षाव झाले
नेतृत्व गेले पण ना डगमगले
अजिंक्य राष्ट्र!

विषगुरुची भयाने दातखीळ
पेगासिसची दाबतील कळ
उघडतील बघा जुनी फाईल
पुन्हा नव्याने!

अमेरिकेचे व्हावे गर्वहरण!
म्हणून बाळगले होते मौन!
विषगुरुचे थोर्थोर द्रष्टेपण!
ध्यानी घ्यावे हो!!

गॅसटंचाईचे आग्यामोहोळ
सुरु चटके आणि झळ
विषगुरुची मग चुळबूळ
जाहली सुरु!

सहिष्णु जनतेकडे पाहून
बदलले इराणने धोरण
समुद्रमार्गे होर्मुझमधून
पोहोचती जहाजे!

विषगुरुच्या मेल्या संवेदना
परराष्ट्रनीतीची उडाली दैना
हरेक भारतीयाची ही वेदना
मांडलेली!

शांतीवार्तेचा मध्यस्थ कोण?
शेजारी देशाचेच अच्छे दिन
कुणाची दलाली का म्हणून
करावी म्हणे!

विषगुरुचा हा धोरण लकवा
शेजारी राष्ट्राची पत वाढवा
पूर्वसूरींची प्रतिष्ठा घालवा
पुरेपूर!

ऐसा विषगुरुचा महिमा
भंगली देशाची प्रतिमा
अंधभक्तांना मात्र तमा
नाही कशाची!
🚩         -भरत यादव
         Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने