🚩
मिशाळू बुढ्याने
खाल्ले पुन्हा शेण
म्हणे सहा जून
करा बंद!
नाही बा लायकी
शिवद्रोह्या तुझी
नाव उच्चारण्याची
शिवबाचे!
रायगड नाही
पेशवे महाल
तुझी भटी चाल
गुंडाळ बा!
शिवशंभू नावे
चालवी दुकान
आणि बहूजन
नादावती!
तिथी-पंचागाची
सांगतो महत्ता
कालचाच कित्ता
गिरवतो!
तिथीतारखेचा
वाद सनातन
काढी उकरुन
दरसाली!
ब्राह्मणशाहीचे
जाहलो गुलाम
म्हणून तमाम
सोकावले!
शिक्षणापासून
दूर दूर नेती
आणि नासवती
तरुणाई!
कुठे गेले सांग
सुवर्णसिंहासन
गुंज गुंज सोनं
केले गोळा!
मसनात गेल्या
गोवर्या तरीही
सुधारणा नाही
किंचितही!
उसळते रक्त
गड दर्शनाने
कोटी कोटी मने
गरजती!
सहा जून आम्हा
अस्मितेचा क्षण
कुणीही अडवून
दाखवावे!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav