अभिनंदन!
अर्जुनाने पुन्हा टाॅप केले!!
अर्जुन भडकला होता.
तोही चांगलाच.
कारण द्रोणाचार्यांनी एकलव्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली होती.
सगळीकडे द्रोणाचार्यांची
वाहवा होत होती.
द्रोणाचार्यांच्या या निर्णयाचे भरभरून कौतुक केले जात होते.
‘गुरुवर, तुम्ही अर्जुनला टॉपर बनवण्याचे वचन दिले आहे,’ द्रोणाचार्यांच्या ज्युनियरने त्यांना आठवण करून दिली.
‘चांगलेच लक्षात आहे,’
द्रोणाचार्य म्हणाले.
‘एवढ्या मुश्किलीने तर ही नोकरी मिळाली आहे! अशी नोकरी पुन्हा कुठे मिळणार? आज हस्तिनापुरात बेरोजगारीने टोक गाठले आहे,’
ज्युनियरने सावध केले.
‘मला माहीत आहे!’
‘दुसरा काही उपाय केला असता, उदाहरणार्थ अंगठा कापून घेणे वगैरे...’ ज्युनियरने दुसरे उपाय सुचवले.
‘त्यामुळे बदनामी होईल.’
‘तुम्ही तुमच्या पोटावर लाथ मारा, पण माझ्या पोटावर लाथ का मारता?’ ज्युनियर संतापून म्हणाला.
द्रोणाचार्य शांत राहिले.
बरोबरच आहे म्हणतात ते,
'साठी बुद्धी नाठी!’
ज्युनियर दातओठ खात म्हणाला.
‘मी खूप विचार केला आहे. परीक्षेव्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय केला, तर अर्जुनाच्या प्रतिभेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि मी पक्षपाती ठरेन!
एक नवी व्यवस्था तयार करावी लागेल,’ द्रोणाचार्यांनी संयमाने ज्युनियरला समजावले.
काही दिवसांत AIDDE अर्थात अखिल भारतीय धुरंधर धनुर्धर परीक्षा आयोजित करण्यात आली.
आणि काही दिवसांनंतर
निकालही जाहीर झाला.
अर्जुनने परीक्षेत टॉप केले.
निकाल जाहीर झाल्यानंतर द्रोणाचार्य अर्जुनाकडे गेले.
तिथे त्यांना टेबलवर सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेची एक छायांकित प्रत पडलेली दिसली.
ती पाहताच द्रोणाचार्य प्रेमाने म्हणाले,
‘काय हवं आहे, आयुष्मान?
'एकलव्य प्रोटेस्टला बसला
पाहिजे का?’
अर्जुनाने क्षणाचाही विलंब न करता त्या प्रश्नपत्रिकेचे,
आपल्या लायटरचा समर्पक उपयोग करत होमकुंडात
रूपांतर केले.
द्रोणाचार्यांनी अर्जुनची पाठ थोपटली आणि
त्याचे अभिनंदन केले.
काही दिवसांनी हस्तिनापुरातील लोकांना परीक्षेबद्दल नव्हे,
तर एकलव्याबद्दल एक गोष्ट कळली
---
एकलव्य कमिटेड टू सुसाइड!!!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
कांग्रेचुलेशन!
अर्जुन ने फिर टॉप किया
अर्जुन भड़का हुआ था। वह भी बुरी तरह से। क्योंकि द्रोणाचार्य ने एकलव्य को परीक्षा में बैठने की अनुमति दे दी थी।
हर तरफ द्रोणाचार्य की जै जै हो रही थी । द्रोणाचार्य के इस निर्णय की भूरि -भूरि प्रशंसा हो रही थी।
‘ गुरुवर आपने अर्जुन को टाॅपर बनाने का वचन दिया है।’ द्रोणाचार्य के जूनियर ने याद दिलाया।
‘ अच्छे से याद है।’ द्रोणाचार्य बोले।
‘ इतनी मुश्किल से तो यह जॉब मिली! ऐसी नौकरी कहाँ मिलेगी! आज हस्तिनापुर में बेरोजगारी अपने चरम पर है।’ जूनियर ने चेताया।
‘ जानता हूँ!’
‘ कोई और उपाय कर लेते,जैसे अगूंठा काट लेना वगैरह…’ जूनियर ने दूसरे उपाय बताये।
‘ इससे बदनामी होगी।’
‘ आप अपने पेट पर लात मारिये,मगर मेरे पेट पर लात क्यों मारते हैं !’ जूनियर क्रोध में बोला।
द्रोणाचार्य शांत रहे।
‘ सही कहते हैं हिंदुओं में बुड्ढे सठिया जाते हैं!’ जूनियर दाँत पीसकर बोला।
‘ मैंने बहुत सोचा। परीक्षा से इतर और कोई उपाय अर्जुन की प्रतिभा पर प्रश्न चिन्ह ही लगाएगी और मुझे पक्षपाती ! एक नया सिस्टम बनाना होगा। ‘ द्रोणाचार्य ने संयम का परिचय देते हुए जूनियर को समझाया।
कुछ दिनों में AIDDE यानी अखिल भारतीय धुरंधर धनुर्धर परीक्षा का आयोजन हुआ।
और कुछ दिनों बाद रिजल्ट भी आया।
अर्जुन ने परीक्षा में टॉप किया।
रिजल्ट आउट होने के बाद द्रोणाचार्य अर्जुन के पास गए, तो देखा मेज पर साल्व्ड प्रश्नपत्र की फ़ोटो कॉपी पड़ी हुई है। उसे देखते ही द्रोणाचार्य प्यार से बोले,‘ क्या चाहते हो आयुष्मान! एकलव्य प्रोटेस्ट पर बैठ जाए!’
अर्जुन ने तत्क्षण उस पेपर को अपने लाइटर का समुचित उपयोग करते हुए उसे स्वाहा कर दिया। द्रोणाचार्य ने अर्जुन की पीठ ठोंकी और उसे मुबारकबाद दी।
कुछ दिनों बाद हस्तिनापुर वासियों को परीक्षा के विषय में नहीं एकलव्य के बारे में एक बात पता चली।
एकलव्य कमिटेड टू सुसाइड!!!
©अनूप मणि त्रिपाठी
Anoop Mani Tripathi