आम्हाला असा देश नको,
जिथल्या वातावरणातच बारूद मिसळला गेलाय,
जिथे माणुसकीचा श्वास गुदमरतोय
आम्हाला अशी लोकशाहीही नको,
जिथे लोकांनाच व्यवस्था निर्दयपणे तुडवायला लागते,
आणि लोकांच्या किंकाळ्या
तिला मधुर संगीतासारख्या वाटू लागतात
आम्हाला अशी निवडणूक व्यवस्था नको,
जिथे निवडून देऊनही
आपल्या पसंतीचा उमेदवार
निवडण्याचे स्वातंत्र्य उरत नाही
आम्हाला असा सत्ताधीश नको,
ज्याच्या
दातांवर रक्ताचे डाग असतील,
हातात मांसाचा गोळा असेल,
आणि ज्याच्या हास्याने
गर्भात वाढणारी लेकरंसुद्धा
भयाने थरथरू लागतील
आम्हाला
कोणताही अवतारी पुरुष नकोय,
सत्यावर पडदा टाकणारा नव्हे,
तर सत्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा
एक साधा माणूस हवा
आम्हाला
असा न्याय नको,ज्याचा तराजू
पैसा आणि सत्तेच्या वजनाने
एका बाजूला झुकतो
आम्हाला
काहीही असलं-तसलं नकोय,
सगळं काही लोकांचं हवंय,
आणि लोकांसाठी हवंय!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
हमें कुछ भी ऐसा वैसा नहीं चाहिए
हमें ऐसा देश नहीं चाहिए
जहां की आवोहवा में बारूद घोल दिया गया हो
मनुष्यता का दम घुटता हो जहां
हमें ऐसा लोकतंत्र भी नहीं चाहिए
जहां लोक को तंत्र बर्बरता से रोंदने लगे
और उसे लोगों की चीख-पुकार लगे
मधुर संगीत की तरह
हमें ऐसी चुनाव व्यवस्था नहीं चाहिए
जहां चुनकर भी न चुन सकें
अपनी पसंद का उम्मीदवार
हमें ऐसा श्रेष्ठ सत्ताधीश नहीं चाहिए
जिसके दांतों पर खून लगा हो
और हाथों में मांस का लोथड़ा हो
कोख में पल रही संतानें
जिसकी मुस्कान से डर-सहम जाती हों
हमें नहीं चाहिए कोई अवतारी पुरुष
सच पर परदा डालने वाला नहीं
सच के लिए मर-मिटने वाला
कोई आम आदमी चाहिए
हमें ऐसा न्याय नहीं चाहिए
जिसका तराजू झुक जाता हो
धन और सत्ता के वज़न से
हमें कुछ भी ऐसा-वैसा नहीं चाहिए
सबकुछ लोक का चाहिए
लोक के लिए चाहिए।
©भानु प्रकाश रघुवंशी
Bhanuprakash Raghuwanshi